Join us   

दिवाळी स्पेशल : पाहा लक्ष्मीच्या पावलांचे सुंदर वेगवेगळे प्रकार, घरभर सजतील लक्ष्मीची पाऊलं आणि येईल समृध्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2024 2:27 PM

1 / 8
शुभ प्रसंगी आपण आवर्जून लक्ष्मीची पावलं घराच्या उंबरठ्यावर किंवा देवापाशी लावतो. लक्ष्मीचा घरात वास राहावा यासाठी लावली जाणारी ही पावलं सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध असतात.
2 / 8
प्लास्टीक किंवा लाकडी स्वरुपात मिळणारी ही पावलं उंबऱ्यावर लावायला सोपी असतात आणि लक्ष्मी घरात नांदण्यासाठी ती प्रतिक मानली जातात.
3 / 8
पत्र्याची पातळ पावलंही दाराच्या बाहेर लावायला अतिशय छान वाटतात. रांगोळीच्या बाजुला ही पावलं चांगली दिसतात.
4 / 8
लाकडी पावलांचे बरेच प्रकार सध्या बाजारात आहेत. रांगोळी, रंग किंवा अगदी चमकी आणि मोत्यांनी आपण ही पावलं आपल्या आवडीनुसार सजवू शकतो.
5 / 8
अॅक्रेलिक प्रकारात मोडणारी ही पावलं म्हणजे कडप्प्यावर रांगोळी काढल्याप्रमाणे दिसतात. दिसायला अतिशय नाजूक आणि आकर्षक असणारी ही पावलं यंदा दिवाळीच्या निमित्ताने आपण आणू शकतो.
6 / 8
प्लास्टीकची अशाप्रकारची पावलं दिसायला तर सुरेख आणि नेमकी दिसतातच पण ती वजनानेही हलकी असतात. अशी पावलं दारापाशी चिकटवणंही सोपं असतं त्यामुळे महिला ही पावलं घ्यायला प्राधान्य देताना दिसतात.
7 / 8
प्लास्टीक, अॅक्रेलिक यांबरोबरच मोत्याची अशी पावलंही काही महिला घरी करतात. मोत्याची ही पावलं नुसती ठेवली किंवा चिकटवली तरी चालतात. ती दिसायलाही नक्षीदार आणि छान दिसतात.
8 / 8
पावलांचे अशाप्रकारचे स्टीकर्स आणायला, लावायला आणि काढायलाही सोपे असतात. दिवाळीच्या दरम्यान अगदी ठिकठिकाणी हे स्टीकर्स अगदी सहज मिळतात.
टॅग्स : खरेदीदिवाळी 2024दिवाळीतील पूजा विधी