दिवाळीसाठी शिवा लेटेस्ट पॅटर्नचे ब्लाऊज; एक से एक स्लिव्हज डिजाईन्स पाहा-क्लासी लूक मिळेल Published:October 27, 2023 02:54 PM 2023-10-27T14:54:48+5:30 2023-10-27T15:29:25+5:30
Diwali Special New Style Blouse Sleeves Pattern : या दिवाळीला तुम्ही काठा पदराची किंवा ऑरगेंजा कोणतीही साडी घेणार असाल तरीही त्यावर सुट होतील असे लेटेस्ट स्लिव्हजचे डिजाईन्स पाहूया दिवाळील घराघरातील महिला नवीन साडी घेतात. साडीवर नेहमी जुन्या, काकूबाई पॅटर्नचं ब्लाऊज शिवण्यापेक्षा तुम्ही लेटेस्ट् पॅटर्न्स ट्राय करू शकता. आजकाल पफस्लिव्ह, नेटचे स्लिव्हज, थ्री-फोर स्लिव्हज किंवा फूल स्लिव्हजच्या ब्लाऊजची फॅशन दिसून येते. (Blouse Hand Designs Latest)
कोणत्या साडीवर कोणत्या प्रकारची ब्लाऊज डिजाईन शोभून दिसेल याचाही अंदाज तुम्हाला हे पॅटर्न बघून येईल. (Latest Stylish Blouse Sleeves Pattern Blouse sleeve ideas)
या दिवाळीला तुम्ही काठा पदराची किंवा ऑरगेंजा कोणतीही साडी घेणार असाल तरीही त्यावर सुट होतील असे लेटेस्ट स्लिव्हजचे डिजाईन्स पाहूया. (Blouse Hand Pattern New)
जर तुमचे दंड बारीक असतील तर तुम्ही स्लिव्हलेस किंवा शॉर्ट स्लिव्हजचे पॅटर्न ट्राय करू शकता. पण जर तुमचे दंड जाड असतील तर तुम्ही थ्री-फोर हॅण्ड्सचे ब्लाऊज शिवू शकता
ब्लाऊज शिजवाना जुन्या ब्लाऊजचे माप देणं टाळा. कारण जर तुमच्या शरीरात बदल झाले असतील ब्लाऊज लूज किंवा घट्ट होण्याची शक्यता असते. म्हणून अंगाचे माप देऊन व्यवस्थित ब्लाऊज शिवून घ्या.
काठापदराची किंवा सेमी सिल्क साडी असेल तर तुम्ही त्यावर पफ सिल्व्हजचं ब्लाऊज शिवू शकता. गळ्याच्या बाजूला खड्यांचे वर्क उठून दिसेल.
सेमी लॉन्ग ब्लाऊजमध्ये नेटचे पॅटर्नसुद्धा उठून दिसेल. त्यावर मोराचा किंवा नथीचा पॅच तुम्ही टेलर कडून लावून घेऊ शकता.
जर तुम्ही बोट नेक पॅटर्नचे ब्लाऊज शिवणार असाल तर त्यात प्लेन थ्री-फोर हॅण्ड्स सुंदर दिसतील.
ब्लाऊजसाठी चोकोनी डिजान्सचे वर्क सध्या खूप चर्चेत आहे. एखाद्या लग्नासाठी किंवा मोठ्या कार्यक्रमासासाठी तुम्ही हे हेवी वर्कचे ब्लाऊज वापरू शकता.
बटन्स आणि पतंगाप्रमाणे आकार असलेल्या ब्लाऊजमुळे सिंपल साडीलाही चांगला लूक येईल.
पफ स्लिव्ह बरोबर तुम्ही साडीच्या बॉर्डरनुसार मोठी बॉर्डर ब्लाऊजलाही जोडून घेऊ शकता.
बारीक दंडांना शॉर्ट स्लिव्हजचे ब्लाऊज उठून दिसते. गोल्डन किंवा सिल्वर मण्यांचे वर्क तुम्ही ब्लाऊजवर शिवून घेऊ शकता.
सिंपल ब्लाऊज शिवून त्यावर आकर्षक डिजाईन्सच्या लेस लावू शकता. २५० ते ८०० रूपयांपर्यंत तुम्हाला एकापेक्षा एक लेस उपलब्ध होतील.
तुम्ही बेल बॉटम ब्लाऊजसुद्धा स्टायलिश पद्धतीने शिवू शकता किंवा ब्लाऊज सिंपल ठेवून त्याला फ्रिलचे हात लावू शकता.
सिंपल बलून स्टाईल छोटे स्लिव्ह शिवून तुम्ही कॉन्ट्रान्स लेस निवडू शकता. जेणेकरून ब्लाऊज अधिकच उठून दिसेल.
बोट नेक ब्लाऊज आणि गळ्याच्या आणि हातांच्या टोकाला कापडाचे छोटे, छोटे बॉल्स शिवून घेऊ शकता.