Diwali Special Blouse Design : दिवाळीसाठी रेडीमेड ब्लाऊज घेताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा; पाहा एकापेक्षा एक लेटेस्ट पॅटर्न By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 10:57 AM 1 / 16दिवाळी म्हटलं की सगळ्यात आधी डोक्यात येते शॉपिंग. (Diwali shopping 2021) सणासुदीला अनेक घरांमध्ये साडीचा डिसेंट लूक केला जातो. 2 / 16सध्या रेडिमेड ब्लाऊजची (Readymade blouse design) फॅशन पाहायला मिळतेय. खासकरून बोटनेक, डीपनेक, कॉलर नेक, जॅकेट स्टाईल ब्लाऊज, ऑफ शोल्डर्स, खणांचे ब्लाऊज जास्तीत जास्त महिलांकडून खरेदी केले जातात. 3 / 16या लेखात आम्ही तुम्हाला काही लेटेस्ट पॅटर्न दाखवणार आहोत. (latest blouse designs) हे ब्लाऊज विकत घेण्यासाठी तुम्हाला बाजारात जाण्याची गरज नाही ऑनलाईनसुद्धा विकत घेऊ शकता. यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि चांगले पॅटर्न पाहायला मिळतील. 4 / 16जुनं ते सोनं असं म्हणतात हे तुम्हाला ब्लाऊज स्टाईल्समध्ये पाहायला मिळेल. फुग्यांच्या ब्लाऊजची जुनी फॅशन आता पुन्हा दिसून येतेय. सिंपल साडीवर असं ब्लाऊज शिवल्यानं साडीचा लूक अधिक खुलून येतो. 5 / 16आजही अनेक महिला ब्लाऊजच्या मागच्या बाजूला आवडीनं गोंडे लाावून घेतात. मोठ्या गळ्यांच्या ब्लाऊजला गोंडे लावल्यानं पाठ उठून दिसते. 6 / 16बोट नेक स्टाईलचा ब्लाईज कॅरी केला तर तुम्हाला गळ्यात जास्त काही घालावं लागणार नाही. झुमके किंवा मोठे इयररिंग्स कॅरी केले तरी लूक परिपूर्ण दिसेल.7 / 16आपल्या साडीच्या रंगाला सुट होईल असं थ्री-फोर हॅण्ड्सचं ब्लाऊजही तुम्ही रेडीमेड विकत घेऊ शकता. 8 / 16स्लिव्हजलेस ब्लाऊज तुम्ही कधी ट्राय केलं नसेल तर एकदा नक्की रेडीमेड विकत घेऊन पाहा. 9 / 16रेडीमेड ब्लाऊज घेतल्यानंतर तुम्ही एकाच ब्लाऊजवर वेगवेगळ्या साड्या नेसू शकता. 10 / 16जर तुम्ही ऑनालाईन ब्लाऊज घेत असाल तर याचे फॅब्रिक्स, पॅटर्न कसं आहे ते पाहून मगच ऑर्डर करा. अन्यथा साडीचं कापड आणि ब्लाऊजचं कापड मिसमॅच होऊ शकतं. 11 / 16प्लेन गोल्डन ब्लाऊज तुम्ही कोणत्याही फॅन्सी साड्यांवर वापरू शकता. स्मॉल, मिडिअम, लार्ज, एक्स्ट्रा लार्जचे त्या त्या ब्रॅंडनुसार माप दिलेले असते. तुमच्या ब्राच्या साईजनुसार तुम्हाला ब्लाऊजची साईज निवडावी लागते. 12 / 16कारण जर ब्लाऊज व्यवस्थित नसेल तर तुमचा लुक खराब दिसू शकतो.13 / 16ऑनलाईन ब्लाऊज विकत घेत असाल तर त्याची रिटर्न पॉलिसी लक्षात घ्या. कारण जर ब्लाऊजची राईज, रंग, पॅटन याबाबत काहीही तक्रार असेल तर तुम्हाला ते परत करताना अडचण येणार नाही.14 / 1615 / 1616 / 16 आणखी वाचा Subscribe to Notifications