Don't forget to bring these 5 things for Laxmi Poojan in Diwali
दिवाळीत किराणा भरताना ५ अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आणणं विसरू नका.. लक्ष्मीपुजन करायचं तर..Published:October 23, 2022 04:15 PM2022-10-23T16:15:16+5:302022-10-23T16:20:02+5:30Join usJoin usNext १. दिवाळी आली की कपड्यांची खरेदी, गिफ्ट्सची खरेदी हमखास केली जाते. शिवाय एखादी गाडी, वाहन, सोन्याचे दागदागिने, इलेक्ट्रिक वस्तू अशा मोठ्या खरेदीही होतात. पण नेमकं स्वयंपाक घरातल्या किंवा पुजेतल्या काही लहान- सहान पण अतिशय महत्त्वाच्या वस्तू आपण विसरतो आणि मग ऐनवेळी गडबड होते. २. त्यामुळे दिवाळीचं सामान आणताना या काही छोट्या- छोट्या गोष्टी तुम्ही आणल्या आहेत ना, किंवा तुमच्या सामानाच्या यादीमध्ये त्या आहेत ना, हे एकदा तपासून घ्या. ३. लक्ष्मीपुजनात जे ५ बोळके ठेवतात, त्यापैकी एका बोळक्यात थोडासा कापूस ठेवतात. आजकाल आपण वाती विकतच आणतो. त्यामुळे मग कापसाची आठवण येण्याचा प्रश्नच नसतो. म्हणून पुजेसाठी कपूस आधीच बघून ठेवा. ४. धनेपूड- जिरेपूड घरात असते. पण पुजेसाठी धने ठेवावे लागतात. ते घरात नसतील तर आधी आणून ठेवा. ५. लाह्या आपण आठवणीने आणतो, पण बत्तासे आणायला मात्र विसरून जातो. त्यामुळे तुमच्या यादीत ते आधी ठेवा. ६. पुजेला सुटे पैसे हमखास लागतातच. या पैशांची आधीच पाहणी करून ठेवा. ७. लाल सुपाऱ्या, पुजेतले बदाम या गोष्टीही पुजेसाठी लागतात. लहानच असल्या तरी पुजेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असतात. त्यामुळे त्या ही किराणाच्या यादीत हमखास देऊन ठेवा. टॅग्स :खरेदीदिवाळी 2022ShoppingDiwali