दिवाळीत किराणा भरताना ५ अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आणणं विसरू नका.. लक्ष्मीपुजन करायचं तर.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2022 4:15 PM 1 / 7१. दिवाळी आली की कपड्यांची खरेदी, गिफ्ट्सची खरेदी हमखास केली जाते. शिवाय एखादी गाडी, वाहन, सोन्याचे दागदागिने, इलेक्ट्रिक वस्तू अशा मोठ्या खरेदीही होतात. पण नेमकं स्वयंपाक घरातल्या किंवा पुजेतल्या काही लहान- सहान पण अतिशय महत्त्वाच्या वस्तू आपण विसरतो आणि मग ऐनवेळी गडबड होते.2 / 7 २. त्यामुळे दिवाळीचं सामान आणताना या काही छोट्या- छोट्या गोष्टी तुम्ही आणल्या आहेत ना, किंवा तुमच्या सामानाच्या यादीमध्ये त्या आहेत ना, हे एकदा तपासून घ्या.3 / 7 ३. लक्ष्मीपुजनात जे ५ बोळके ठेवतात, त्यापैकी एका बोळक्यात थोडासा कापूस ठेवतात. आजकाल आपण वाती विकतच आणतो. त्यामुळे मग कापसाची आठवण येण्याचा प्रश्नच नसतो. म्हणून पुजेसाठी कपूस आधीच बघून ठेवा.4 / 7४. धनेपूड- जिरेपूड घरात असते. पण पुजेसाठी धने ठेवावे लागतात. ते घरात नसतील तर आधी आणून ठेवा.5 / 7५. लाह्या आपण आठवणीने आणतो, पण बत्तासे आणायला मात्र विसरून जातो. त्यामुळे तुमच्या यादीत ते आधी ठेवा.6 / 7६. पुजेला सुटे पैसे हमखास लागतातच. या पैशांची आधीच पाहणी करून ठेवा.7 / 7७. लाल सुपाऱ्या, पुजेतले बदाम या गोष्टीही पुजेसाठी लागतात. लहानच असल्या तरी पुजेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असतात. त्यामुळे त्या ही किराणाच्या यादीत हमखास देऊन ठेवा. आणखी वाचा Subscribe to Notifications