नवरात्रीत कुमारीका पुजनाला काय भेटवस्तू द्यायची? पाहा ७ पर्याय, स्वस्त आणि सुंदरही By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2023 9:45 AM 1 / 9नवरात्री म्हटली की कुमारीका पूजनाला विशेष महत्त्व असते. कुमारीकांना ओवाळून त्यांना काहीतरी भेटवस्तू देण्याची पद्धत आहे. 2 / 9बहुतांश घरी ५ किंवा ७ कुमारीकांना पूजेसाठी बोलावले जाते. त्यांची पूजा करुन त्यांना फराळ दिला जातो. स्त्रियांना मान देणे हा त्यामागील मुख्य उद्देश असतो. 3 / 9मुलींना शाळेसाठी पेन्सिल, खोडरबर, खडू, पेन, शार्पनर असे काही ना काही सतत लागतेच. अशा गोष्टींचा सेट दिल्यास मुलींसाठी उपयुक्त वस्तू होऊ शकते. 4 / 9पर्स ही लहान मुलींना आवडणारी आणखी १ गोष्ट. मोठ्या महिलांसारखी आपणही पर्स घ्यायला त्यांना आवडत असल्याने लहानशी पर्स दिल्यास मुली खूश होतात. 5 / 9ताग्यातले कापड हा मुलींना देण्यासाठी १ चांगला पर्याय आहे. बाजारात खणाचे, सिल्कचे विविध रंगांचे आणि डिझाईन्सचे कापड मिळतात. याचा फ्रॉक, कुर्ता असे काहीही शिवात येऊ शकते.6 / 9 हेअऱबँड, क्लिप्स, हेअर बो या गोष्टी तर मुलींना डझनावारी आणल्या तरी कमीच पडतात. छान फॅशनेबल हेअर अॅक्सेसरीज मुलींना भेट म्हणून देऊ शकतो. 7 / 9गोष्टीची पुस्तके हा कोणत्याही वयोगटातील मुलींना देण्यासाठी १ उत्तम पर्याय आहे. मुली लहान असतील तर घरातले या गोष्टी वाचून दाखवू शकतात नाहीतर मुली स्वत:ही वाचू शकतात. 8 / 9वॉटरबॅग आणि टिफिन बॉक्स हेही सतत लागत असल्याने छान कलरफुल असे खरेदी केल्यास मुली अतिशय आवडीने ते वापरतात.9 / 9 शारीरिक हालचाल होईल अशा अॅक्टीव्हीटीजही स्वस्तात मस्त मिळतात त्या गिफ्टसाठी चांगले पर्याय होऊ शकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications