बॉलिवूड अभिनेत्रींनी लग्नात घातलेले महागडे लेहंगे; एकाहून एक जबर किमती आणि अफाट सुंदर! पाहा फोटो

Published:November 17, 2021 07:50 PM2021-11-17T19:50:14+5:302021-11-17T20:01:08+5:30

लाखांतील किमती ऐकून थक्क व्हायला होईल अशा कपड्यांचा तुम्ही-आम्ही कधी विचारही करु शकत नाही...

बॉलिवूड अभिनेत्रींनी लग्नात घातलेले महागडे लेहंगे; एकाहून एक जबर किमती आणि अफाट सुंदर! पाहा फोटो

आपलं लग्न एकदम थाटामाटात, जोरदार व्हावं असंच प्रत्येक मुलीला वाटत असतं. लग्नाच्या दिवशी आपण एकदम राजकुमारीसारखे दिसावे अशी तिची इच्छा असते. मग लग्नातील कपड्यांसाठी अनेक तरुणी बॉलिवूडमधील अभिनेत्रींना फॉलो करतात. या अभिनेत्रींचे लखोंच्या घरात असणारे लेहंगे तुम्ही-आम्ही पाहातच राहावे असे असतात. या लेहंग्यांमध्ये या अभिनेत्रींचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. पाहूयात बॉलिवूडमधील अशाच काही प्रसिद्ध अभिनेत्रींचे लेहेंगे आणि त्याच्या किमती

बॉलिवूड अभिनेत्रींनी लग्नात घातलेले महागडे लेहंगे; एकाहून एक जबर किमती आणि अफाट सुंदर! पाहा फोटो

ऐश्वर्या राय - बच्चन ही जगातील सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. तिचे लग्नातील कपडे सर्वात महागडे कपडे म्हणून गणले जातात. ऐश्वर्याने तिच्या लग्नात नेसलेली गोल्डन रंगाची कांजिवरम साडी निता लुल्ला या फॅशन डिझायनरने डिझाइन केलेली होती. त्यावर क्रीस्टल आणि गोल्डन रंगाच्या दोऱ्याने वर्क केलेले होते. या साडीत ऐश्वर्याचा पारंपरिक लूक अतिशय सुंदर दिसत होता. ही साडी थोडीथोडकी नाही तर तब्बल ७५ लाख रुपये किमतीची असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या यादीत ऐश्वर्या राय हिचा सर्वात पहिला नंबर लागतो.

बॉलिवूड अभिनेत्रींनी लग्नात घातलेले महागडे लेहंगे; एकाहून एक जबर किमती आणि अफाट सुंदर! पाहा फोटो

शिल्पा शेट्टी ही प्रसिद्ध अभिनेत्रीही तिच्या लग्नातील लाल रंगाच्या डिझायनर साडीत अतिशय आकर्षक दिसत होती. प्रसिद्ध फॅशन जिझायनर तरुण तहिलियानी यांनी या साडीचे डिझाइन केले होते. साडी चमकदार होण्यासाठी त्यावर ८ हजार स्वारोवस्की क्रीस्टल लावण्यात आले होते. लग्नातील या आपल्या मोहक रुपासाठी शिल्पानेही ५० लाख रुपये मोजल्याचे म्हटले जाते.

बॉलिवूड अभिनेत्रींनी लग्नात घातलेले महागडे लेहंगे; एकाहून एक जबर किमती आणि अफाट सुंदर! पाहा फोटो

नवाब सैफ अली खान याच्याशी लग्न करणार म्हटल्यावर त्याच्या बेगमप्रमाणे दिसण्यासाठी करीना कपूर हिने आपला लग्नातील लूक अतिशय शाही केला होता. तिचा लेहंगा रितू कुमार हिने सजवला होता. हा घागरा तिची सासू शर्मिला टागोर हिने तिच्या लग्नात घातलेला घागरा होता. तर तिच्या रिसेप्शनचा लेहंगा मनिष म्हलोत्रा याने डिझाइन केलेला होता. आपल्या या बेगम लूकसाठी करीनानेही थोडेथोडके नाही तर तब्बल ५० लाख रुपये मोजले होते.

बॉलिवूड अभिनेत्रींनी लग्नात घातलेले महागडे लेहंगे; एकाहून एक जबर किमती आणि अफाट सुंदर! पाहा फोटो

अनुष्का शर्मा हिने प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली याच्याशी लग्न केले. इटलीमध्ये झालेल्या या लग्नसोहळ्यासाठी अनुष्काने सब्यसाचीने डिझाइन केलेला बेबीपिंक रंगाचा लेहंगा घातला होता. या लूकमध्ये अनुष्का खूपच सुंदर दिसत होती. पूर्ण भरजरी अशा लेहंग्यावर तिने नेटची मस्त ओढणी घेतली होती.

बॉलिवूड अभिनेत्रींनी लग्नात घातलेले महागडे लेहंगे; एकाहून एक जबर किमती आणि अफाट सुंदर! पाहा फोटो

इंटर कास्ट लग्न केलेल्या जेनेलिया डिसूझा हिने अभिनेता रितेश देशमुख याच्याशी लग्न केले. त्यांनी ख्रिश्चन आणि महाराष्ट्रीयन अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले. तिचा वेडींग ड्रेस प्रसिद्ध डिझायनर निता लुल्ला हिने डिझाइन केला होता. तसेच तिने महाराष्ट्रीय लूकसाठी नेसलेली साडीही अतिशय आकर्षक होती. या साडीत जेनेलिया आणखीनच गोंडस दिसत होती. या सगळ्याचा मिळून खर्च १७ लाख रुपये इतका होता.

बॉलिवूड अभिनेत्रींनी लग्नात घातलेले महागडे लेहंगे; एकाहून एक जबर किमती आणि अफाट सुंदर! पाहा फोटो

उर्मिला मातोंडकर हिने तिच्या लग्नासाठी अतिशय सुंदर असा भरलेला लाल रंगाचा लेहंगा घातला होता. प्रसिद्ध बॉलिवूड डिझायनर मनिष मल्होत्रा याने हा लेहंगा डिझाइन केला होता. या लेहंग्यामध्ये उर्मिला एखाद्या बाहुलीसारखी दिसत होती.

बॉलिवूड अभिनेत्रींनी लग्नात घातलेले महागडे लेहंगे; एकाहून एक जबर किमती आणि अफाट सुंदर! पाहा फोटो

बिपाशा बासू हिने तिच्या लग्नात घातलेला भरजरी लेहंगा सब्यसाचीने डिझाइन केला होता. हा लेहंगा ४ लाख रुपये किमतीचा असून ही किंमत लेहंग्यावर झळकत होती इतका तो सुंदर रितीने डिझाइन करण्यात आला होता. या लेहंग्यामध्ये बिपाशा नेहमीपेक्षा स्टनिंग दिसत होती. त्यावर तिने घातलेली ज्वेलरीही खूपच भरजरी आणि आकर्षक होती.

बॉलिवूड अभिनेत्रींनी लग्नात घातलेले महागडे लेहंगे; एकाहून एक जबर किमती आणि अफाट सुंदर! पाहा फोटो

बॉलिवूडमधील एक सुंदर आणि आगळीवेगळी अभिनेत्री म्हणून दिया मिर्झा हिच्याकडे पाहिले जाते. तिचा ब्रायडल लूक अतिशय देखणा होता. रितू कुमार क्रिएशनकडून हे डिझाइन करण्यात आवे होते. तिच्या ड्रेसचे डिझाइन, एम्ब्रॉडरी आणि रंग अतिशय वेगळा होता. तिने कुर्ती आणि फारसी पायजमा असा लूक केला होता. हैद्राबादी संस्कृतीला शोभेल असा रंग आणि वेश तिने केला होता. या आगळ्यावेगळ्या ड्रेसची किंमत ३ लाखांच्या घरात होती.

बॉलिवूड अभिनेत्रींनी लग्नात घातलेले महागडे लेहंगे; एकाहून एक जबर किमती आणि अफाट सुंदर! पाहा फोटो

इशा देओल हिनेही निता लुल्ला हिने डिझाइन केलेला लाल रंगाची साडी नेसली होती. ही साडी कांजिवरम होती आणि त्यावर लाल आणि गोल्डन रंगाचे वर्क केलेले होते. या लूकमध्ये इशा देओल एकदम खानदानी दिसत होती. हा पारंपरिक लूक तिच्यावर शोभून दिसावा यासाठी तिने ३ लाख रुपये खर्च केले होते.