Join us   

दिवाळीसाठी कपडे, दागिने तर घेतले; चप्पल घ्यायची बाकी असेल तर पाहा एक से एक पर्याय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2023 1:29 PM

1 / 10
दिवाळीसाठी आपण केसापासून पायापर्यंत तयार होतो. अशावेळी कपड्यांवर साजेशी अशी चप्पल किंवा सँडल तर हवीच. अजून चपलेची खरेदी बाकी असेल तर पाहा बाजारात उपलब्ध असलेले एक से एक पर्याय (Footware Shopping for Diwali Festival)...
2 / 10
जूती हा एव्हरग्रीन प्रकार असून कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर या फ्लॅट जूती अगदी कोणत्याही वयाच्या महिला अगदी सहज घालू शकतात. त्या दिसायलाही सुंदर दिसतात.
3 / 10
उंची कमी असेल आणि हिल्समध्ये पाहत असाल तर अशाप्रकारचे सिंपल पण सोबर पर्याय अगदी छान वाटतात.
4 / 10
पार्टीवेअर किंवा वेस्टर्न कपड्यांवर जातील असे वर्क केलेले सँडल हा नवा ट्रेंड आहे. अगदी जिन्सपासून ते साडीपर्यंत अशा सगळ्या आऊटफिटसवर हा प्रकार सूट होतो.
5 / 10
खूप हेवी लेहेंगा, साडी असे काही घालणार असाल आणि ते घोळदार असेल तर हिल्स घालणे केव्हाही उत्तम. त्यासाठी पेन्सिल हिल्समध्ये आणि थोडे डीझायनर असे बरेच पर्याय बाजारात उपलब्ध आहेत.
6 / 10
फार भरजरी आणि वर्क केलेली जूती नको असेल तर अशाप्रकारची थोडी सिंपल जूतीची निवडही तुम्ही करु शकता. पंजाबी ड्रेसपासून जीन्सपर्यंत सगळ्यावर ती छान दिसते.
7 / 10
जूती किंवा चप्पल पायातून निघेल, सटकेल अशी भिती असेल तर अशाप्रकारच्या सिंपल सँडल्सचा तुम्ही नक्की विचार करु शकता.
8 / 10
खूप वेगळं, हटके काही वापरायचं नसेल आणि नेहमीप्रमाणेच एखादी छानशी चप्पल कम सँडल घ्यायची असेल तर असे प्रकार तर बाजारात अगदी सहज उपलब्ध असतात.
9 / 10
तुमचे पाय नाजूक असतील आणि तुम्हाला फार धावपळ करायची वेळ येत नसेल तर अशाप्रकारचे थोडे डेलिकेट प्रकारातील फूटवेअर तुम्ही नक्की ट्राय करु शकता.
10 / 10
डीझायनर आणि कम्फर्टेबल असलेल्या चपला तर अगदी कॉमन असून त्या घालायला सोप्या आणि कशावरही सूट होणाऱ्या असल्याने हा उत्तम पर्याय आहे.
टॅग्स : दिवाळी 2023खरेदीफॅशन