दिवाळीत बहिणीला काय गिफ्ट द्यायचं? ८ पर्याय, प्रेमाचं सुंदर गिफ्ट, बहिण होईल खुश By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2022 6:03 PM 1 / 9१. दिवाळीला दरवर्षी बहिणीला काय गिफ्ट द्यावं, हा खरोखरंच प्रत्येक भावापुढे पडलेला प्रश्न असतो. कारण प्रत्येक वर्षीचं गिफ्ट काहीतरी वेगळं, हटके असावं, अशी बहिणीची अपेक्षा असते. म्हणूनच तर हे काही पर्याय बघा. यावर्षीच्या गिफ्टची खरेदी झाली नसेल, तर याचा उपयोग होऊ शकतो.2 / 9२. बहिणीला ब्यूटी पार्लरमध्ये वारंवार जाण्याची आवड असेल तर तुमच्या शहरातील एखाद्या नामवंत पार्लरमध्ये ब्यूटी ट्रिटमेंट्स घेण्यासाठी तिला तिथले कूपन घेऊन देऊ शकता. मेकअप आणि ब्यूटी ट्रिटमेंट्स आवडणाऱ्या बहिणीला हे गिफ्ट नक्कीच आवडणार.3 / 9३. असाच एक दुसरा पर्याय म्हणजे जीमची किंवा एखाद्या योगा क्लासची मेंबरशिप. बऱ्याच जणांना व्यायामाचा कंटाळा येतो. पण असं जर कुणी थेट जिममध्ये किंवा योगा क्लासमध्ये आपली फिस भरून आलं, तर मात्र तो क्लास करावाच लागतो. त्यामुळे बहिणीच्या आरोग्यासाठी हे गिफ्ट चांगलं असेल. सुरुवातीला ३ महिन्यांची मेंबरशिप घेऊन देऊ शकता. ते बजेटमध्येही बसेल.4 / 9४. गिफ्ट व्हाऊचर हा एक चांगला पर्याय होऊ शकतो. बऱ्याचदा आपलं गिफ्ट बहिणीला आवडेल की नाही, असं वाटतं. त्यामुळे चॉईसची भानगडच नको. सरळ तुमच्या बजेटनुसार ऑनलाईन गिफ्ट व्हाऊचर घेऊन द्या, म्हणजे बहिणी तिच्या आवडीनुसार खरेदी करेल. 5 / 9 ५. बहिणीचं जर नोकरी करणारी आणि त्यातही वर्क फ्रॉम होम करणारी असेल, तर तिला तिचं काम सोपं होण्यासाठी वायरलेस माऊस, ऑफिस चेअर, टेबल, वायरलेस हेडफोन असं काही देता येतं का ते बघा.6 / 9६. तुमचं बजेट अगदी २०- २५ हजार किंवा त्यापेक्षाही जास्त असेल तर बहिणीच्या नावे सरळ एखाद्या बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट करून टाका.7 / 9७. बहिणीचा एखादा छंद असेल तर त्या क्लाससाठीही तुम्ही तिचं ॲडमिशन करून देऊ शकता. आजकाल ऑनलाईन क्लासेसचे पर्यायही उपलब्ध आहेत. 8 / 9८. वाचनाची आवड असेल तर पुस्तकाशिवाय उत्तम गिफ्ट दुसरं असूच शकत नाही.9 / 9९. पर्यटनाची आवड असेल तर कोणतीतरी छान ट्रिप प्लॅन करा आणि बहिणीसाठी बूक करा. आणखी वाचा Subscribe to Notifications