Join us   

Gold Long Mangalsutra : लग्नसराईसाठी घ्या मोठं मंगळसुत्रं; १० नवीन आकर्षक डिजाईन्स; शोभून दिसेल दागिना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 8:24 PM

1 / 10
साडी नेसायची म्हटलं की मोठं मंगळसुत्रचं घालावं लागतं. लग्न समारंभात, मोठ्या कार्यक्रमात किंवा घरात सणासुधीला मोठं मंगळसुत्र अगदी शोभून दिसतं. मोठ्या मंगळसुत्राचे काही खास पॅटर्न्स तुमच्यावर उठून दिसतील. (Latest Gold Long Mangalsutra Designs)
2 / 10
सध्या पानाचं किंवा वाट्यांचं पेंडंट फारसं दिसत नाही. तुम्हाला पेडंटमध्येही वेगवेगळ्या डिजाईन्स पाहायला मिळतील.(Gold Long Mangalsutra )
3 / 10
काहींना मंगळसुत्रात गोल्डन मणी जास्त आवडतात तर काहींना काळे मणी फार आवडतात. तुम्ही आपल्या आवडीनुसार मंगळसुत्र बनवून घेऊ शकता.
4 / 10
१ ते २ तोळे सोन्यातही तुम्ही असं मंगळसुत्र बनवून घेऊ शकता. जर तुम्हाला आर्टिफिशयल मंगळसुत्र हवं असेल तर २ ते ३ ग्रॅम सोन्यातही अशा डिजाईन्स उपलब्ध असतील.
5 / 10
मंगळसुत्रात तुम्ही लाल, गुलाबी किवा हिरवे स्टोन्स लावून घेऊ शकता.
6 / 10
या प्रकारच्या गोल पेंडंटचा सध्या क्रेझ आहे. ही मंगळसुत्र तुम्ही कोणत्याही खास प्रसंगी घालू शकता.
7 / 10
चौकोनी पेंडट आणि खाली लटकन हे पॅटर्नसुद्धा सुंदर उठून दिसतं.
8 / 10
तीन सरी किंवा चार सरींमध्ये तुम्हाला चेन च्या वेगवेगळ्या डिजाईन्स निवडता येतील.
9 / 10
सोन्याच्या मंगळसुत्राबरोबर कानातल्यांचा आणि बांगड्यांचा सेटही निवडू शकता.
10 / 10
जर मंगळसुत्रात पारंपारीक टच हवा असेल तर तुम्ही त्यात मोत्यांची डिजाईन निवडू शकता.
टॅग्स : खरेदीफॅशनब्यूटी टिप्सदागिनेसोनं