1 / 11सोन्याचे भाव सध्या अक्षरश: गगनाला भिडले आहेत. पण तरीही साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा अक्षय्य तृतीयेचा सण शुक्रवारी साजरा होत आहे. त्यामुळे हे मुहूर्त गाठून सोनं खरेदी करण्याची अनेकांची इच्छा असते. 2 / 11पण सध्या सोन्याचे भाव वाढलेले असल्याने खूप जास्त नाही, पण मुहूर्तावर करायची म्हणून छोटीशी काही खरेदी करायची असेल तर तुम्ही पुढील पर्यायांच्या माध्यमातून सोन्याची थोडीफार खरेदी करू शकता. यामुळे खिशाला झळ बसणार नाही. शिवाय मुहूर्तावर सोने खरेदी केल्याचा आनंदही होईल.3 / 11अर्धा ग्रॅम, १ ग्रॅम किंवा यापेक्षाही जास्त तुम्हाला जशी परवडेल तशी सोन्याची वेढणी घेऊन ठेवा. पुढे दागिना करण्यासाठी किंवा सध्या गुंतवणूक, बचत म्हणून ती उपयोगात येऊ शकते.4 / 11 दागिनाच घ्यायचा असेल तर एखादी १८ कॅरेटची १ ग्रॅम नथही घेऊ शकता. २२ कॅरेट, २४ कॅरेटपेक्षा तिचा भाव कमी असतो. शिवाय एक छानसा दागिनाही होऊन जातो.5 / 11१ ग्रॅम किंवा दिड ग्रॅम पर्यंत छानसे नाजूक कानातले येतात. तुमच्यासाठी किंवा लेकीसाठी ती खरेदी करू शकता.6 / 11कानातल्यांप्रमाणेच दिड ते दोन ग्रॅम पर्यंत अंगठीही चांगली मिळू शकते. यातही १८ कॅरेटची घेतली तर किंमत बरीच कमी असते.7 / 11१ ग्रॅमचे मणीही घेऊन ठेवू शकता. पुढे मागे एखादं गळ्यातलं करण्यासाठी ते उपयोगी येतील.8 / 11मंगळसूत्र किंवा सोन्याच्या साखळीसाठी एखादे नाजूकसे पेंडंटही घेऊन ठेवू शकता. दिड ते दोन ग्रॅम पर्यंत चांगले नाजूक पेंडंट येतात.9 / 11नाकातली मोरणी देखील घेऊ शकता. थोडं बजेट जास्त असेल तर सोन्यात मढवलेली हिऱ्याची मोरणी घ्या.10 / 11 सोन्याची पॉलिश असणारे मोत्याचे दागिनेही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर घेता येतील. यामुळे सोन्यासोबत मोत्यांचीही खरेदी होईल आणि छानसा दागिनाही होऊन जाईल.11 / 11३ ते ४ ग्रॅम एवढं बजेट असेल तर ठुशीची खरेदीही करू शकता. लाखेचे मणी असणाऱ्या ठुशी कमी वजनात मिळतात.