फक्त २० रूपयांत सुंदर लूक देतील हूप इअररिंग्स; सोन्याच्या कानातल्यांपेक्षा दिसतील युनिक
Updated:November 8, 2024 17:42 IST2024-11-08T16:06:08+5:302024-11-08T17:42:52+5:30
Hoop Earrings Designs : वेस्टर्न वेअर किंवा ड्रेस घातल्यानंतर कानाला शोभतील असे हूप इअररिंग्स तुम्ही ट्राय करू शकता

कानातले घातल्यानंतर चेहऱ्याला शोभा येते. नेहमी नेहमी सोन्याचे कानातले घालण्याचा कंटाळा येतो. वेस्टर्न वेअर किंवा ड्रेस घातल्यानंतर कानाला शोभतील असे हूप इअररिंग्स तुम्ही ट्राय करू शकता. (Latest Hoop Earrings Designs)
हूप इअररिंग्सची खासियत अशी की हे नाजूक, मोठ्या सर्व पॅटर्न्समध्ये मिळतात. २० रूपयांपासून ५० रूपयांपर्यंत ते ५०० रूपयांपर्यंत तुम्हाला सुंदर हूप इअररिंग्स घालता येतील.
अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा असे इअररिंग्स घालतात. त्यांच्या लूक ने प्रभावित होऊन तुम्ही तुमच्या आवडीच्या कानातल्यांची निवड करू शकता.
रिंग्स, सिंगल स्टोन, स्टार, बटरफ्लाय, मल्टीपल रिंग्स, अशा वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये हे कानातले मिळतात.
तुम्हाला मोठ्या रिंग्स आवडत असतील तर ऑनलाईन या कानातल्यांचे एकापेक्षा एक पर्याय तुम्हाला मिळतील.
हे कानातले जाड नसातत आणि टिकायलाही चांगले असतात तर तुम्ही पाण्यात वापरले नाही तर वर्षानुवर्ष चांगले राहतात.
नाजूक पॅटर्नसुद्धा या कानातल्यांमध्ये उपलब्ध आहेत. ऑनलाईन किंवा जवळच्या नॉव्हेल्टी शॉपमध्ये तुम्हाला हे मिळतील.
या कानातले सेटसुद्धा बरेच विकले जातात. यात तुम्हाला एकापेक्षा जास्त सुंदर, सुंदर कानातल्यांची व्हरायटी मिळेल.
जर तुम्ही ऑनलाईन हे कानातले विकत घेत असाल तर स्वस्तात सेट्स उपलब्ध होतील.
जर तुम्हाला कानात मोती घालायला आवडत असतील तर तुम्ही या पद्धतीनं लहान, मोठे हूप इअररिंग्स निवडू शकता.