किचनमध्ये बघावं तिकडे झुरळं फिरताना दिसतात? ४ सोपे बदल, घरात एक झुरळ दिसणार नाही By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2024 12:38 PM 1 / 6पावसाळा असो किंवा अन्य कोणताही ऋतू असो.. बऱ्याचदा आपल्या घरात आणि विशेषत: स्वयंपाकघरात बघावं तिकडे झुरळं फिरताना दिसतात. 2 / 6घरात लहान मुलं असल्याने बाजारात झुरळांसाठी मिळणारे केमिकलयुक्त स्प्रे मारायलाही नको वाटतं. त्यामुळेच घरातला झुरळांचा उच्छाद कमी करायचा असेल तर स्वत:ला ४ सवयी लावून घ्या. यामुळे तुमच्या घरात कधीच झुरळं दिसणार नाहीत. 3 / 6पहिली सवय म्हणजे रात्री झोपण्यापुर्वी स्वयंपाकाचा ओटा, डायनिंग टेबल किंवा अन्नपदार्थ ठेवण्याची जागा आणि सिंक स्वच्छ करून घ्या. त्यावर कुठेही खरकटं, ओलसर पदार्थ नसावेत. खरकट्या पदार्थांच्या वासाने लगेच झुरळं येतात. 4 / 6सिंकमध्ये कधीही खरकटे भांडे ठेवू नका. घरातल्या झुरळांचं प्रमाण वाढण्याचं ते एक मोठं कारण आहे.5 / 6बेकिंग सोडा आणि व्हिनेगर यांचं मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये तयार करून ठेवा. दररोज रात्री हे मिश्रण सिंकमध्ये तसेच ओट्यावर शिंपडून सिंक आणि ओटा स्वच्छ करा. हे उपाय housewife_to_homemaker या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत. 6 / 6व्हिनेगर, पाणी, डिशवॉश लिक्विड आणि इसेंशियल ऑईल टाकून एक मिश्रण तयार करा. आठवड्यातून दोन वेळा हे मिश्रण गॅसवर, ओट्यावर शिंपडून स्वच्छता करा. यामुळेही झुरळांचे तसेच इतर किटकांचे प्रमाण कमी होते. आणखी वाचा Subscribe to Notifications