बघताक्षणीच करा गोड संत्रीची पारख, बघा लगेच कसा ओळखायचा गोड आणि आंबट संत्रीमधला फरक By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2024 9:10 AM 1 / 6हिवाळा सुरू झाला की बाजारात भरपूर प्रमाणात संत्री येतात. त्यानुसार आता जवळपास प्रत्येक शहरातल्याच स्थानिक बाजारपेठांमध्ये संत्री यायला सुरुवात झाली आहे.(how to identify sweet and juicy orange or santra?)2 / 6संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी, ॲण्टीऑक्सिडंट्स, फायबर मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे संत्री आरोग्यासाठी तर अतिशय फायदेशीर आहेच, पण त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठीही संत्री खूप उपयुक्त ठरते. पण बऱ्याचदा असं होतं की आपण बाजारातून जी संत्री आणतो ती एवढी आंबट असते की खाण्याची अजिबातच इच्छा होत नाही.(tips and tricks for buying sweet oranges or santra)3 / 6म्हणूनच गोड संत्रीची पारख अगदी बघताक्षणीच कशी करायची ते पाहा.. त्यापैकी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी संत्री आकाराने मोठी आहे ती घ्या. कारण आकाराने मोठी असणारी संत्री जास्त रसाळ आणि गोड असते.4 / 6ज्या संत्रीचं सालं हे थोडं जाडसर असतं तसेच अगदी किंचित मऊ पडलेलं असतं अशी संत्री गोड निघते. आंबट संत्रींची सालं ही पातळ असतात तसेच ती संत्रीच्या आतल्या भागाला घट्ट चिकटून बसल्यासारखी वाटतात.5 / 6संत्री हातात उचलून पाहा. जी संत्री वजनाला हलकी लागेल ती घेऊ नका. वजनदार संत्री जास्त रसाळ आणि गोड निघते असं काही फळ विक्रेते सांगतात. 6 / 6संत्रीचं साल नखाने थोडंसं खरवडून पाहा. जर त्यातून छान गोड सुवास आला तर ती संत्री घ्या. ज्या संत्रीचा तीव्र सुवास येत नाही, ती संत्री आंबट निघण्याची शक्यता जरा जास्त असते. आणखी वाचा Subscribe to Notifications