उंबऱ्यावरचं माप ओलांडून नवरी घरात येते, लक्ष्मीच्या स्वागतासाठी हवंच खास सुंदर माप! पाहा एकसेएक फोटो...
Updated:March 5, 2025 17:09 IST2025-03-05T16:57:27+5:302025-03-05T17:09:27+5:30
Indian Marriage Bride Housewarming Mapta : Griha Pravesh Kalash Maap : नव्या नवरीच्या स्वागताला हवंच देखणं सुंदर माप उंबरड्यावर, पाहा सुंदर सजवलेल्या मापांचे खास क्रिएटिव्ह फोटो...

लग्न म्हटलं की वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रथा, परंपरा पाळाव्या लागतात. आपल्याकडील लग्न पद्धतीमध्ये नवी नवरी गृहप्रवेशाच्या वेळी धान्याने भरलेलं माप ( Griha Pravesh Kalash Maap ) ओलांडून सासरच्या घरी प्रवेश करते.
विवाह होऊन घरी येणारी नववधू ही लक्ष्मीचे स्वरूप असते असे आपल्याकडे मानले जाते. तसेच पूर्वीच्या काळी घरात धनधान्याची समृद्धी असणे हेच सुखाचे मोजमाप होते. ही परंपरा आजही आपल्याकडे पाळली जाते. यासाठीच पूर्वीच्या काळी माप म्हणून तांबे किंवा चांदीचा गडू वापरला जात असे. परंतु जसजसा काळ बदलत गेला तसे या मापट्याचे रूप देखील बदलू लागले.
सध्या बाजारांत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे तसेच नव्या (Indian Marriage Bride Housewarming Mapta ) डिजाईन्सचे, टिकल्या, मोती, खड्यांनी सजवलेले मापं पाहायला मिळतात. वेगवेगळ्या डिझाइन्सचे माप विकत मिळतात त्याच्या अनोख्या डिझाईन्स पाहूयात.
आपण अशा प्रकारे टिकल्यांची सजावट केलेलं अतिशय सुंदर नक्षीकाम असलेल माप खरेदी करु शकता.
टिकल्यांसोबतच अशा प्रकारचे भरजरी रंगेबेरंगी कापडाने सजविलेले माप आपल्याला बाजारांत अगदी सहज विकत मिळतील.
जर आपल्याला कुंदन वर्क आवडत असेल तर आपण अशा पद्धतीच्या कुंदन टिकल्या लावून सजविलेले माप विकत घेऊ शकता.
रंगीबेरंगी खडे, टिकल्या,मणी आणि मोत्यांचा वापर करुन सजविलेले माप आणखीनच सुंदर दिसते.
आपल्याकडे कोणत्याही धार्मिक कार्यात लाल रंग शुभ मानला जातो. यासाठी आपण असे स्वस्तिक आणि शुभ लाभ लिहिलेले माप देखील तुमच्या पसंतीनुसार निवडू शकता.
या मापावर सोनेरी रंगाचा कागद चिटकवून त्यावर लेसची सुंदर, नाजूक अशी डिझाईन तयार केलेली असते. बाजारांत अशा वेगवेगळ्या डिज़ाईन्सचे माप विकायला ठेवलेले दिसतात. यंदा तुमच्या घरात देखील लग्न कार्य असेल तर तुम्ही देखील यापैकी एक सुंदर माप विकत घेऊ शकता.