दिवाळीत नटायचं तर अंगावर हवेच ‘हे’ दागिने, पाहा एकसेएक सुंदर दागिने-स्वस्तात मस्तही

Updated:October 17, 2024 18:29 IST2024-10-17T18:09:23+5:302024-10-17T18:29:24+5:30

Jewellery shopping for Diwali : एरवी नाही पण सणावाराच्या निमित्ताने आपले लाड, कौतुक आपणच करायला हवे..

दिवाळीत नटायचं तर अंगावर हवेच ‘हे’ दागिने, पाहा एकसेएक सुंदर दागिने-स्वस्तात मस्तही

दागिने म्हणजे महिलांचे सौंदर्य खुलवणारे अलंकार. दिवाळीसारख्या सणाच्या निमित्ताने महिला दागिन्यांची खरेदी करतात. पण ती करताना आपल्या डोळ्यासमोर पारंपरिक आणि नव्याने आलेल्या दागिन्यांचे प्रकार असायला हवेत (Jewellery shopping for Diwali) .

दिवाळीत नटायचं तर अंगावर हवेच ‘हे’ दागिने, पाहा एकसेएक सुंदर दागिने-स्वस्तात मस्तही

मोत्याचे दागिने हा दागिन्यांतील पारंपरीक प्रकार असून हे दागिने सणावाराला काठाच्या साड्यांवर छानच दिसतात. ड्रेसवरही हे दागिने खुलून येतात. मध्यभागी छानसे पदक आणि वर नाजूक मोत्यांची डिझाईन आपलं सौंदर्य खुलवते.

दिवाळीत नटायचं तर अंगावर हवेच ‘हे’ दागिने, पाहा एकसेएक सुंदर दागिने-स्वस्तात मस्तही

कुंदन आणि त्यावर मोती अशा प्रकारातील हे दागिने म्हणजे थोड्या फॅन्सी किंवा डीझायनर साड्यांवर छान दिसतात. पुर्वीच्या खड्यांच्या दागिन्यांना हे दागिने चांगला पर्याय ठरु शकतात.

दिवाळीत नटायचं तर अंगावर हवेच ‘हे’ दागिने, पाहा एकसेएक सुंदर दागिने-स्वस्तात मस्तही

अगदी नऊवारी साडीपासून ते मॉडर्न प्रकारच्या ड्रेसपर्यंत कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर घालता येईल असा एखादा तरी सेट आपल्याकडे असायलाच हवा. त्यामुळे घाईच्या वेळी आपला ज्वेलरी निवडण्यात फारसा वेळ जात नाही.

दिवाळीत नटायचं तर अंगावर हवेच ‘हे’ दागिने, पाहा एकसेएक सुंदर दागिने-स्वस्तात मस्तही

संध्याकाळचे समारंभ, थोडी मॉडर्न प्रकारातील साडी किंवा घागरा यांच्यावर असा भरजरी सेट उठून दिसतो. आधुनिक पद्धतीचे हे डिझाईन्स आपल्या सौंदर्यात भर घालतात.

दिवाळीत नटायचं तर अंगावर हवेच ‘हे’ दागिने, पाहा एकसेएक सुंदर दागिने-स्वस्तात मस्तही

सिल्व्हर किंवा ऑक्सिडाइज ज्वेलरीची सध्या फॅशन असून आपण कॉटन प्रकारातले किंवा थोडे वेगळ्या पद्धतीचे कपडे घालणार असू तर त्यावर अशी सिंपल पण सोबर ज्वेलरी छान दिसते.

दिवाळीत नटायचं तर अंगावर हवेच ‘हे’ दागिने, पाहा एकसेएक सुंदर दागिने-स्वस्तात मस्तही

इमिटेड ज्वेलरीमध्ये येणारे थोडे बोल्ड पण तितकेच एलिगंट दिसणारे हे दागिने सणावाराला फारच सुंदर दिसतात. हा एक सेट घातल्यावर बाकी काहीच घातले नाही तरी चालते.

दिवाळीत नटायचं तर अंगावर हवेच ‘हे’ दागिने, पाहा एकसेएक सुंदर दागिने-स्वस्तात मस्तही

दिवाळी आणि त्यानंतर लग्नसराई अशासाठी दागिने खरेदी करणार असाल तर अशाप्रकारचे भरगच्च दागिनेही छान वाटतात. असे सेट वेगवेगळ्या प्रकारे आपण पेअर करु शकतो.