दिवाळीत नटायचं तर अंगावर हवेच ‘हे’ दागिने, पाहा एकसेएक सुंदर दागिने-स्वस्तात मस्तही By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2024 6:09 PM 1 / 8दागिने म्हणजे महिलांचे सौंदर्य खुलवणारे अलंकार. दिवाळीसारख्या सणाच्या निमित्ताने महिला दागिन्यांची खरेदी करतात. पण ती करताना आपल्या डोळ्यासमोर पारंपरिक आणि नव्याने आलेल्या दागिन्यांचे प्रकार असायला हवेत (Jewellery shopping for Diwali) . 2 / 8मोत्याचे दागिने हा दागिन्यांतील पारंपरीक प्रकार असून हे दागिने सणावाराला काठाच्या साड्यांवर छानच दिसतात. ड्रेसवरही हे दागिने खुलून येतात. मध्यभागी छानसे पदक आणि वर नाजूक मोत्यांची डिझाईन आपलं सौंदर्य खुलवते.3 / 8कुंदन आणि त्यावर मोती अशा प्रकारातील हे दागिने म्हणजे थोड्या फॅन्सी किंवा डीझायनर साड्यांवर छान दिसतात. पुर्वीच्या खड्यांच्या दागिन्यांना हे दागिने चांगला पर्याय ठरु शकतात.4 / 8अगदी नऊवारी साडीपासून ते मॉडर्न प्रकारच्या ड्रेसपर्यंत कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर घालता येईल असा एखादा तरी सेट आपल्याकडे असायलाच हवा. त्यामुळे घाईच्या वेळी आपला ज्वेलरी निवडण्यात फारसा वेळ जात नाही.5 / 8संध्याकाळचे समारंभ, थोडी मॉडर्न प्रकारातील साडी किंवा घागरा यांच्यावर असा भरजरी सेट उठून दिसतो. आधुनिक पद्धतीचे हे डिझाईन्स आपल्या सौंदर्यात भर घालतात. 6 / 8सिल्व्हर किंवा ऑक्सिडाइज ज्वेलरीची सध्या फॅशन असून आपण कॉटन प्रकारातले किंवा थोडे वेगळ्या पद्धतीचे कपडे घालणार असू तर त्यावर अशी सिंपल पण सोबर ज्वेलरी छान दिसते. 7 / 8इमिटेड ज्वेलरीमध्ये येणारे थोडे बोल्ड पण तितकेच एलिगंट दिसणारे हे दागिने सणावाराला फारच सुंदर दिसतात. हा एक सेट घातल्यावर बाकी काहीच घातले नाही तरी चालते.8 / 8दिवाळी आणि त्यानंतर लग्नसराई अशासाठी दागिने खरेदी करणार असाल तर अशाप्रकारचे भरगच्च दागिनेही छान वाटतात. असे सेट वेगवेगळ्या प्रकारे आपण पेअर करु शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications