kanjivaram silk saree price range : प्युअर सिल्क, खरी कांजीवरम साडी कशी ओळखायची? परफेक्ट साडी घेण्यासाठी 'या' ट्रिक्स ठेवा लक्षात By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2022 3:59 PM 1 / 14सिल्क, काठापदराच्या साड्या प्रत्येकीलाच हव्याहव्याशा वाटतात. लग्नात किंवा कोणत्याही सणाच्या दिवशी तुमचं सौंदर्य खुलवण्यात या साड्यांचा खूप मोठा वाटा असतो. अत्यंत सुंदर, आकर्षक, रिच लूक देणाऱ्या साड्या आपल्या कपाटात असाव्यात असं प्रत्येकालाच वाटतं. (Pure silk sarees) 2 / 14दक्षिण भारताची खासियत असलेल्या (Kanjivaram Sarees) कांजीवरम साड्या म्हटलं की डोळ्यात वेगळीच चमक येते. तामिळनाडूतील कांचीपुरम (Kanchipuram) या गावातील ही मूळ साडी.3 / 14साधारणपणे एक कांजीवरम साडी बनवायला 15 दिवस ते एक महिन्याचा इतका कालावधी लागतो. अत्यंत कलाकुसरीचे काम असेल तर सहा महिनेदेखील लागतात. साडीचं पॅटर्न, रंग, धागा आणि बॉर्डरवरील शिवणकाम यावर त्याची किंमत ठरत असते. 4 / 14बऱ्याच महिलांना साड्यांमधलं प्युअर सिल्क आणि आर्टिफिशियल सिल्क यातला नेमका फरक कळत नाही. त्यामुळे फसवणूक देखील होऊ शकते. म्हणूनच या लेखात तुम्हाला प्युअर सिल्क, खरी कांजीवरम साडी ओळखण्याच्या ट्रिक्स सांगणार आहोत. 5 / 14साडी विक्रेते प्रदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार ''खऱ्या कांजीवरम साड्यांची कमीत कमी विक्री किंमत साधारण ५ ते ६ हजारांपासून सुरू होते. जास्तीत जास्त १०, २० ते ४० हजारांपर्यंत या साडीच्या किमती असू शकतात. साडीची बॉर्डर, पॅटर्न, वर्क यावरून किंमत ठरत असते. या साड्या खास गट्टी बॉर्डरसाठी ओळखल्या जातात. 6 / 14आर्टिफिशियल सिल्क साड्या १००० ते २५०० रूपयांपर्यंत सहज उपलब्ध होतात. आर्टिफिशल सिल्कच्या साड्यांचा पोत कडक असतो. तुलनेने प्युअर सिल्क साड्या खूप सॉफ्ट असतात. आर्टिफिशल सिल्कला शक्यतो गट्टी बॉर्डर नसते. फिनिशिंगमध्ये खूप फरक दिसून येतो.''7 / 14अनेकांचा असा गैरसमज असतो की कांजीवरम साडी ही त्यावरील डिझाईन्समुळे वजनाला जड असते. पण असं अजिबात नाही. खरी कांजीवरम ही हलकी आणि सॉफ्ट असून जास्त वजनदार नसते. साडी विकत घेताना ती वजनदार लागते की हलकी याची नक्की खात्री करून घ्या 8 / 14साडीची जरी कशी आहे ते व्यवस्थित पाहा. त्यासाठी तुम्ही साडीची जर खेचून पाहा. याचा धागा लाल न दिसता पांढरा दिसला अथवा अन्य कोणताही रंग दिसला तर ही साडी खरी कांजीवरम साडी नाही हे समजून जा. 9 / 14शक्यतो कांजीवरम साडीचा धागा हा लालच असतो. कारण लाल रेशमाच्या धाग्यापासून ही साडी तयार करतात. 10 / 14मूळ कांजीवराम साडीचा पल्लू किमान सहा ते आठ इंच लांब आणि रेशमी कापडाचा असतो. इतकेच नाही तर मूळ कांजीवराम साड्यांच्या पल्लू डिझाईन्स देखील पारंपारिक आहेत जसे की मुघल पॅटर्नने प्रेरित भरतकाम केलेली रचना किंवा मंदिराचे कोरीव काम.11 / 14 एवढ्या प्रयत्नांनंतरही तुम्हाला खरी आणि खोटी यात फरक करता येत नसेल, तर तुमची कांजीवरम साडी अंगठीच्या मधोमध काढण्याचा प्रयत्न करा. होय, अस्सल कांजीवरम साडी अंगठीच्या मध्यभागी सहजपणे बाहेर येईल.12 / 14तुमच्या कांजीवरम साडीच्या भरतकामासाठी वापरलेले धागे तुमच्या साडीच्या पृष्ठभागाच्या दिसण्याशी म्हणजे बॉर्डरशी जुळत नसतील, तर समजा तुम्ही खूप चांगल्या किमतीत बनावट कांजीवरम साडी घरी आणली आहे.13 / 14या साड्यांवर तुम्ही हेवी वर्क ब्लाऊज कॅरी करू शकता. त्याच तुमचा लूक अधिकच उठून दिसेल. (Image Credit- flipkart)14 / 14साऊथ इंडियन स्टाईल हेवी ज्वेलरी या साड्यांवर खुलून दिसते. अशा साड्यांवर तुम्ही शक्यतो गोल्डन ज्वेलरी कॅरी करण्याचा प्रयत्न करा. आणखी वाचा Subscribe to Notifications