Kitchen Tips : फक्त ५०० रूपयात होईल किचनचा मेकओव्हर; स्टायलिश, नव्या कोऱ्या किचनसाठी या घ्या टिप्स By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 5:57 PM 1 / 8किचनमधला पसारा कितीही आवरला तरी ते अस्वच्छ दिसतं. किचन स्वच्छ, चकचकीत ठेवण्यासाठी प्रत्येक घरातील महिला प्रयत्न करत असते. किचनचं रूप पालटण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार नाही. फक्त ५०० रुपयांमध्ये किचन मेकओव्हर अगदी सहज करू शकता. (Kitchen Tips) 2 / 8तुमचे बजेट ५०० रुपये असेल तर भिंती आणि रॅकचा मेकओव्हर करता येईल. त्यासाठी वॉलपेपर (किचनला सुट होईल अशा रंगाचा) वापरता येतील आणि प्लॅस्टिकच्या रॅक स्वतंत्रपणे घेता येतील. जेणेकरून जास्त जागा लागणार नाही. 3 / 8जरी आपण अन्न गरम करण्यासाठी किंवा तेल पडू नये म्हणून अन्नावर अॅल्युमिनियम फॉइल लावतो, परंतु संपूर्ण स्वयंपाकघराचा मेकओव्हर फॉईल पेपरच्या मदतीनं करता येऊ शकतो. 350 रुपयांपर्यंत तुम्हाला ऑइल सेल्फ स्टिकशिवाय वॉलपेपर मिळू शकेल. 4 / 8हे 150-250 रुपयांच्या बजेटमध्ये वॉलपेपरसह येईल. तुम्हाला कोणत्या प्रकारचा ऑर्गनायजर घ्यायचा आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही वॉलपेपर लावत असाल, तर लक्षात ठेवा की सिंकच्या सभोवतालचा साबण हे खराब करू शकतो आणि त्यामुळे सिंकच्या आजूबाजूची जागा स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या बजेटमध्ये ऑर्गनायझर घेऊ शकता.5 / 8400 रुपयांच्या बजेटमध्ये, तुम्हाला R2 लेयर असलेले असे शेल्फ किंवा रॅक मिळू शकतात यामध्ये फक्त बाटल्या आणि जारच ठेवता येत नाहीत तर स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्या लहान वस्तू त्याही या शेल्फमध्ये ठेवता येतात.6 / 8 जर तुम्हाला तुमचं स्वयंपाकघर थोडं व्यवस्थित करायचं असेल, तर बास्केट आणि स्टँड्स सर्वोत्तम ठरू शकतात. यामध्ये मसाल्यांची पाकिटे, मीठ-मिरची आणि लहान वस्तू ठेवता येतात. तीन मोठे बास्केट्स बरेच उपयोगी ठरतात. 7 / 8ऑर्गनायजर स्टँण्डमुळे आपलं स्वयंपाकघर नीट स्वच्छ होतं आणि त्याच बरोबर जास्त कचराही साचतही जातं. वाटल्यास, वॉलपेपर देखील वापरू शकता.8 / 8या लहान लहान वस्तूंनी तुम्ही तुमचं स्वयंपाकघर अतिशय सुंदररित्या सजवू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications