कोल्हापूरी साज त्याचा पारंपरिक थाट! पाहा कोल्हापूरी साजाच्या १० नव्या सुंदर डिझाइन्स, उजळून निघेल रुप
Updated:January 14, 2025 15:33 IST2025-01-14T14:59:14+5:302025-01-14T15:33:03+5:30
Kolhaputi Saaj Designs Jewellery : या दागिन्याचा राजेशाही इतिहास असून अनेक अख्यायिका आणि दंतकथांमध्ये याचा उल्लेख आहे.

लग्नसराईच्या दिवसांत कोणते दागिने घालावेत असा प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो. (Kolhaputi Saaj Designs Jewellery) अशावेळी तुम्ही कोल्हापूरी साज या पारंपारीक महाराष्ट्रीयन दागिन्याची निवड करू शकता. (Kolhaputi Saaj Designs)
हा असा दागिना आहे की जो एक जरी घातला तरी तुमचा गळा भरलेला दिसतो. तुम्हाला इतर दागिने घालावे लागत नाहीत. यात एक, दोन नाही तर बरेच पॅटर्न, वेगवेगळे सेट्स उपलब्ध आहेत. हे दागिने नेमके कसे दिसतात ते पाहूया.
हा पूर्वापार प्रचलित असलेला दागिना असून बऱ्याच स्त्रिया मंगळसुत्राऐवजी परिधान करतात. या आभूषणांमध्ये २१ लोंबते डूल असतात.
त्यापैकी १० डूल हे भगवान विष्णूचे असतात असं मानलं जातं, डूलांचे एक अष्टमंडळ असते, १ डूल माणकाचा, १ पाचूचा आणि एक डूल डोरला म्हणजेच तावीज असतो. यात गुलाबी किंवा लाल रंग प्रामुख्यानं दिसून येतो.
या दागिन्याचा राजेशाही इतिहास असून अनेक अख्यायिका आणि दंतकथांमध्ये याचा उल्लेख आहे.
कोल्हापूरी साजचे चंद्र कोल्हापूरी साज, सुर्य कोल्हापूरी साज, कासव कोल्हापूरी साज, वाघ नखं कोल्हापूरी साज हे काही प्रचलित प्रकार आहेत.
नाग कोल्हापूरी साज, मासा कोल्हापूरी साज, भुंगा, कारले, शंख, कमळ असे वेगवेगळे प्रकार कोल्हापूरी साजमध्ये उपलब्ध आहेत.
तुम्ही चांदीमध्येसुद्धा कोल्हापूरी साज बनवून घेऊ शकता.
मोत्यांमध्येसुद्धा कोल्हापूरी साज जास्त उठून दिसतो.
आर्टिफिशियल ज्वेलरीमध्ये ऑक्साईड ज्वेलरीमध्ये तुम्हाला हे दागिने मिळतील.