फुल स्लिव्हज ब्लाऊजचे १० लेटेस्ट, हटके पॅटर्न्स; दंड स्लिम दिसतील-साडीला येईल युनिक लूक
Updated:February 15, 2024 10:51 IST2024-02-15T09:08:00+5:302024-02-15T10:51:57+5:30
Latest Blouse Full Sleeves Design : फूल स्लिव्हजच्या ब्लाऊमध्ये एकापेक्षा एक पॅटर्न्स दिसून येतात.

लग्नसराई म्हटलं की साड्या आल्याच. साड्यांवर वेगवेगळ्या स्टाईलचे ब्लाऊज शिवून तुम्ही युनिक लूक मिळवू शकता. फुल स्लिव्ह्ज, लॉन्ग स्लिव्हजच्या ब्लाऊजचे काही ट्रेंडी पॅटर्न्स पाहूया. (Stylish Full Sleeves Blouse Design Long Sleeves)
लॉन्ग स्लिव्हजच्या ब्लाऊमध्ये तुमचे दंड फार जाड दिसणार नाहीत. एकदम स्लिम लूक येईल आणि आकर्षक दिसाल
लॉन्ग स्लिव्हजच्या ब्लाऊजमध्ये तुम्ही बोन नेक किंवा व्हि नेक हे पॅटर्न शिवू शकता.
जर साडी प्लेन असेल तर वर्कचे, डिजाईनचे, प्रिंटेट ब्लाऊज निवडा. पण साडी प्लेन नसेल तर ब्लाऊज साधं ठेवा. तेव्हा चांगला लूक येईल
ब्लाऊजला तुम्ही फ्रिलचे किंवा फुगा स्टाईलचे हात शिवू शकता.
फ्रिलच्या हातांमुळे तुम्ही कॉन्फिडेंट दिसाल. लॉन्ग स्लिव्हज असतील तर बांगड्या वैगेर घालण्याची गरज नसते.
पांढऱ्या, काळ्या किंवा कोणत्याह साडीवर तुम्ही या पॅटर्नचे ब्लाऊज शिवू शकता.
काढाच्या साडीवरही लांब स्लिव्हजचे ब्लाऊज चांगले दिसतात.
ब्लाऊजवर तुम्ही आपल्या आवडीनुसार हेवी वर्क करून घेऊ शकता किंवा प्लेन सिंपल ब्लाऊज ठेवू शकता.
(Image Credit- Social Media)