बाह्यांचे १० लेटेस्ट डिझाइन्स- साडीचा खुलेल लूक, दंडही दिसतील स्लिम- पाहा खास स्टायलिश पॅटर्न By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 4:23 PM 1 / 11सध्या लग्नसराईचा सिजन सुरू झाला आहे. त्यामुळे अनेकजणी नवनवीन साड्या खरेदी करत आहेत. नवीन साड्यांवर बोअरिंग पॅटर्नचे ब्लाऊज शिवण्यापेक्षा नवीन डिजाईन्सचे ब्लाऊज शिवले तर लूक अधिकच खुलून येईल. ब्लाऊजच्या स्लिव्हजचे डिजाईन तुम्ही कसे शिवता यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. (Latest Blouse Sleeves Designs)2 / 11ब्लाऊज जितकं सुंदर आणि परफेक्ट असेल तर तितकाच साडीचा लूकही खुलून येतो. ब्लाऊज शिवताना हातांना दंडाच्यावर पफ स्लिव्हज किंवा बलून पॅटर्न उत्तम दिसेल. कारण यात तुमचा बराचसा हात कव्हर होतो. 3 / 11जर दंडांमध्ये फॅट जमा झालं असेल तर दंड झाड झाले असतील तरीही ते यात फार दिसून येत नाहीत. जंड बारीक दिसतात.4 / 11तुमच्या घरातील जवळच्या व्यक्तीचे लग्न असेल तर तुम्ही स्लिव्हजवर आरी वर्क करून घेऊ शकता.5 / 11१५०० रूपयांपासून ५००० रूपयांपर्यंत तुम्हाला हॅण्डवर्क, मशिनवर्क अशा दोन पॅटर्नमध्ये वर्क करून मिळेल. मशिनवर्कच्या तुलने हॅण्डवर्कची शिलाई जास्त असते. 6 / 11जर साडी कॉन्सट्रास्ट असेल तर ब्लाऊजवर जास्त हेवी वर्क करू नका. जर साडी प्लेन असेल तर ब्लाऊजवर हेवी वर्क करा. 7 / 11ब्लाऊजचे स्लिव्हजमध्ये तुम्ही नेटसुद्धा घालू शकता. नेटमुळे ब्लाऊज अधिकच सुंदर किंवा उठून दिसतील. या फोटोतील ब्लाऊजचे सुंदर पॅटर्न्स तुम्ही ट्राय करू शकता.8 / 11ब्लाऊजच्या मध्ये असे छोटे छोटे बटन्स लावून नवीन पॅटर्न ट्राय करू शकता. 9 / 11काठापदराची साडी असेल तर या स्टाईलचे ब्लाऊज ट्राय करा. सिंपल गळ्याऐवजी बोटनेक शिवा. 10 / 11व्हि नेक आणि लांब स्लिव्हजचे ब्लाऊजही स्टनिंग लूक देतात. 11 / 11(फोटो सौजन्य-सोशल मीडिया) आणखी वाचा Subscribe to Notifications