latest fashion oxidise mangalsutra designs, oxidise mangalsutra for daily use
लेटेस्ट फॅशनच्या ऑक्सिडाईज मंगळसूत्रांचे सुंदर डिझाईन्स, रोजच्या वापरासाठी असं एखादं तरी असावंच...Published:September 27, 2024 02:53 PM2024-09-27T14:53:22+5:302024-09-27T15:01:39+5:30Join usJoin usNext नेहमीचे तेच ते टिपिकल प्रकारचे मंगळसूत्र वापरून कंटाळा आला असेल तर थोडा चेंज म्हणून काही दिवस ऑक्सिडाईज मंगळसूत्र वापरून पाहा. तसंही नवरात्रीच्या काळात ऑक्सिडाईज दागिने खूप ट्रेण्डी असतात. त्यामुळे तुमच्याकडेही तसं एखादं मंगळसूत्र असायलाच पाहिजे. शिवाय ऑक्सिडाईज मंगळसूत्रांच्या किमतीही इतर मंगळसूत्रांच्या तुलनेत खूप कमी असतात. त्यामुळे ते खिशाला सहज परवडू शकतात. शिवाय हल्ली बऱ्याच साड्यांवरही इतर कोणत्याही दागिन्यांपेक्षा ऑक्सिडाईज दागिनेच अधिक खुलून बसतात. त्यामुळे हे काही सुंदर डिझाईन्स लगेच बघा.. आणि अशा पद्धतीच्या मंगळसूत्रांची खरेदी झटपट करून टाका. साडीवर घालण्यासाठी असं एखादं ठसठशीत मंगळसूत्र हवंच. शिवाय याचे कानातलेही खूप सुंदर आणि आकर्षक आहेत. टेम्पल ज्वेलरीचा ट्रेंड सध्या आहेच. त्यामुळे ऑक्सिडाईज प्रकारातल्या टेम्पल ज्वेलरीचा हा प्रकारही तुम्ही ट्राय करून पाहू शकता. कमळात बसलेली लक्ष्मी आणि तिच्या बाजूने छोटी छोटी नाजूक फुले, अशा पद्धतीचे हे पेंडंट खूपच लक्षवेधी आणि बघताक्षणीच आवडणारे आहे. जीन्सवर घालायला किंवा कुठल्याही वेस्टर्न कपड्यावर घालायला हे मंगळसूत्र खूप छान आणि नाजूक वाटेल. साडी, पंजाबी सूट किंवा वेस्टर्न कपडे या सगळ्यांसाठीच ते परफेक्ट आहे. हा आणखी एक आकर्षक पॅटर्न बघा. याचे पेंडंट अतिशय वेगळं आहे. सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं तुमच्याकडे असावं, असं वाटत असेल तर असं एखादं डिझाईन घ्यायला हवं. ऑक्सिडाईज ज्वेलरीसोबत मोती हे कॉम्बिनेशनच खूप आकर्षक आहे. ते सहजासहजी मिळतही नाही. असं एखादं मंगळसूत्र तुमच्या कलेक्शनमध्ये असायला हरकत नाही. गळ्यालगत चिकटून बसणारं एखादं भरगच्च, ठसठशीत मंगळसूत्र शोधत असाल तर हे डिझाईन छान आहे. या मंगळसूत्राचे पेंडंट आणि कानातले दोन्हीही अतिशय आकर्षक आणि युनिक आहे. एकदम नव्या पद्धतीचं हटके डिझाईन शोधत असाल तर हे तुम्हाला आवडू शकतं. कोणत्याही वयोगटातल्या महिलांना हे मंगळसूत्र छानच दिसेल. ऑक्सिडाईज मंगळसूत्राचा हा आणखी एक देखणा प्रकार. असं एखादं मंगळसूत्र पाहिलं की ते घेऊन टाकण्याचा मोह अनेकींना अनावर होतो. टॅग्स :खरेदीदागिनेनवरात्रीShoppingjewelleryNavratri