Thushi Bangles: कमी ग्रॅम सोन्यातही करता येतील ठसठशीत ठुशी बांगडी, लग्नसराईसाठी देखणी खरेदी
Updated:November 27, 2024 16:53 IST2024-11-27T15:14:58+5:302024-11-27T16:53:09+5:30

ठुशी हा प्रकार आजही अतिशय लोकप्रिय आहे. आता त्याच पद्धतीने ठुशीच्या बांगड्याही सर्वच वयोगटातल्या महिलांना अतिशय आवडत आहेत.
स्वस्तात मस्त मिळणारे ठुशी बांगड्यांचे काही सुंदर, ठसठशीत डिझाईन्स पाहा.
गळ्यात घालण्याची ठुशी जशी असते त्याच टिपिकल डिझाईनच्या या बांगड्या असतात.
ठुशी बांगड्या अतिशय कमी वजनात तयार होतात. कारण या बांगड्या तयार करण्यासाठी मण्यांमध्ये लाख भरली जाते. त्यामुळे त्या तयार करण्यासाठी कमी सोने लागते.
एक ठुशीची बांगडी साधारण ४ ते ५ ग्रॅम वजनापर्यंत मिळू शकते. म्हणजेच एक तोळा सोन्यात तुमच्या २ ठसठशीत ठुशी बांगड्या तयार होऊ शकतात.
संपूर्ण सोनेरी मणी न घेता अशा पद्धतीचे काळे मणीही तुम्ही ठुशी बांगडीमध्ये घेऊ शकता.
मोत्याच्या ठुशी बांगड्या हा प्रकारही खूप जणींना आवडत आहे. यामध्येही कित्येक प्रकारचे नवनवीन डिझाईन्स उपलब्ध आहेत.
ब्रेसलेटप्रमाणे अशी एकच ठसठशीत ठुशी बांगडी तुम्ही घालू शकता.
ठुशी बांगडीतला हा एक आणखी भरीव प्रकार बघा. ही बांगडी दिसायला भरीव असली तरी वजनाने मात्र अतिशय कमी असते.
ऑक्सीडाईज प्रकारातल्या ठुशी बांगड्याही उपलब्ध आहेत. या बांगड्या तुम्ही तुमच्या शहरातल्या स्थानिक बाजारपेठांमधून किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही मागवू शकता.