कमी किमतीत घ्या ठसठशीत ठुशी कानातले! ७ सुंदर डिझाईन्स, करा पारंपरिक दागिन्यांचा थाट
Updated:December 25, 2024 14:53 IST2024-12-25T11:43:17+5:302024-12-25T14:53:05+5:30

हल्ली सोन्याच्या लाईटवेट दागिन्यांचा ट्रेंड आला आहे. ठुशी हा त्यातलाच एक प्रकार. ठुशी कमी वजनाची असते. त्यामुळे ती इतर दागिन्यांच्या तुलनेत बऱ्याच कमी किमतीत मिळते. तसेच ठुशीच्या कानातल्यांचेही आहे.
या प्रकारचे ठुशीचे कानातले कमी वजनात मिळतात. शिवाय ते टपोरे असल्याने कानात अगदी उठून दिसतात.
त्यामुळेच कमी वजनात सोन्याचे हेवी लूक देणारे कानातले घ्यायचे असतील तर ठुशीचे कानातले हा एक चांगला पर्याय आहे.
अशा रिंग प्रकारातही तुम्ही ठुशी कानातले घेऊ शकता.
या प्रकारच्या कानातल्यांना ठुशी झुमका म्हणतात. कारण याचं डिझाईन ठुशीसारखं आहे आणि त्याच्याखाली नाजूक मण्यांचं छाेटंसं लटकन आहे.
ठुशी झुमका प्रकारातलं हे एक आणखी वेगळं डिझाईन. वर मोत्याच्या कुड्या असतात तसं डिझाईन आणि त्याच्या खाली छानसा झुमका.
अशा प्रकारे सोन्याच्या मण्यांवर नाजूक वर्क केलेले ठुशी कानातलेही अनेकजणी घेतात. पण या डिझाईनमध्ये घाण साचून ते मळकट दिसू शकतात. त्यामुळे ते कधीतरीच लग्नकार्यात घालण्याच्या उपयोगाचे आहेत.