Join us   

लग्नसराईसाठी मराठमोळे पारंपरिक वेडिंग लूक; पाहा नवरीसाठी सुंदर साड्या-मेकअपच्या आयडिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 4:11 PM

1 / 14
लग्न स्वत:चं असो किंवा घरातलं असो. (Wedding Look Marathi) आपण नेहमी सुंदर, आकर्षक दिसावं असं प्रत्येक मुलीला वाटतं. लग्नसराईत तुम्हाला क्रॅरी करता येतील असे साधे, सोपे वेडींग लुक्स पाहूया. लग्नाची खरेदी करायची म्हटलं की खूपच गोंधळायला होतं. अशावेळी या ब्रायडल लूकच्या आयडिया तुम्हाला मदत करतील. (Maharashtrian Wedding Look)
2 / 14
पारंपरिक मराठमोळा महाराष्ट्रीक लूक करायचं म्हटलं की साडी ही आलीच. बरेचजण लग्नात नऊवारी साडी नेसणं पसंत करतात. तर काहीजण सहावारी साडीची नऊवारी शिवून घेतात.
3 / 14
साडी सिंपल ठेवायची असेल तर तुम्ही ब्राऊजवर आरी वर्क डिजाईन्स शिवून घेऊ शकता. बरेचजण आरी वर्कने ब्लाऊचजे हात आणि मागचा गळा भरून घेतात.
4 / 14
वांगी रंग, चिंतामणी रंग किंवा जांभळा रंग पैठणी किंवा नववारी साडी, शालू कशातही उठून आणि अगदी खुलून दिसतो.
5 / 14
साखरपुड्याला हिरवी साडी नेसली जाते. पण आजकाल लग्नातही हिरव्या साड्या घालवण्याचे प्रमाण वाढलं. हिरव्या साडीला लाल किंवा गुलाबी रंगाची, पिवळ्या रंगाची बॉर्डर असेल तर अधिकच उठून दिसते.
6 / 14
नऊवारी साडीवर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कॉन्ट्रास्ट ब्लाऊज शिवू शकतात. शक्यतो थ्री-फोर स्लिव्हजचे ब्लाऊज असेल असे पाहा. जास्त शॉर्ट हात असतील तर लूक चांगला दिसणार नाही.
7 / 14
निळा आणि लाल रंगाचे कॉम्बिनेशन्स बेस्ट आहे. तुमचा कलर टोन गोरा, निम्न गोरा कसाही असेल तरी हाे कॉम्बिनेशन्स तुमचं सौंदर्य खुलवेल.
8 / 14
आजकाल पिवळ्या रंगाच्या पैठणीचा आणि नऊवारीचा क्रझ खूप आहे. बरेचजण स्वत:च्या लग्नात पिवळ्या रंगाची साडी नेसतात.
9 / 14
लाल रंगाची नऊवारी असेल तर त्यावर हिरव्या ब्लाऊजचे कॉम्बिनेशन असे असं पाहा. त्यावर बॉर्डरच्या रंगाला मॅचिंग असेल अशी शाल घ्या.
10 / 14
निळ्या रंगामध्ये तुम्हाला हव्या तशा शेड्स मिळतील. त्यावर गुलाबी काठ असतील किंवा सेम निळ्या रंगाचेच काठ असतील तर तुमचा लूक अधिकच उठून दिसेल.
11 / 14
पिवळ्या रंगाच्या साडीवर हिरवी बॉर्डर उठून दिसेल. तुम्ही विधी लूकसाठी अशी साडी नेसू शकता.
12 / 14
पेशवाई, ब्राम्हणी, मस्तानी, राजलक्ष्मी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तुम्हाला हव्या तशा शिवून मिळतील.
13 / 14
विधी लूकसाठी असा गेटअप केल्यानंतर तुम्ही रिसेप्शनच्या लूकसाठी शालू, लेहेंगा किंवा फॅन्सी गाऊन घालू शकता.
14 / 14
(Image Credit - Social Media)
टॅग्स : ब्यूटी टिप्सखरेदी