Join us

महाराष्ट्रातील १५ पारंपारीक दागिन्यांची नावं; लग्नसराईत घाला सुंदर दागिने, खुलून दिसेल चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 22:59 IST

1 / 16
लग्नसराईच्या दिवसांत काहीतरी नवीन ज्वेलरी घालावी अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. काठा पदराच्या साडीवर पारंपारीक ज्वलेरी असेल तर लूक अधिकच खुलून येते. (Maharashtrian Traditional Jewellery)
2 / 16
पारंपारीक दागिन्यांची नावं बऱ्याचजणांना माहीत नसतात. त्यामुळे ज्वेलरी विकत घेताना अनेकजण गोंधळलेले असतात.
3 / 16
कोल्हापूरी साज हा महाराष्ट्रातीलं पारंपारीक दागिना असून लग्नसमारंभासाठी किंवा नऊवारी साडीवर घालण्यासाठी तुम्ही याची निवड करू शकता.
4 / 16
जोंधळेमणी घातल्यानं गळा भरलेला दिसून येईल. तसंच जोंधळेमणी घालून एलिगंट लूक येईल.
5 / 16
बोरमाळ कोणत्याही काढाच्या साडीवर सुंदर आणि उठून दिसते.
6 / 16
कोल्हापूरी मंगळसुत्रात तुम्हाला बऱ्याच व्हरायटी पाहायला मिळतील. नेहमी वाट्यांचे किंवा पानाचे मंगळसुत्र न घालता तुम्ही असे मंगळसुत्र ट्राय करू शकता.
7 / 16
जर तुम्हाला फार भरलेले दागिने आवडत नसतील तर तुम्ही चिंतागसारखा नाजूक दागिना ट्राय करू शकता.
8 / 16
पुतळीहार हा पारंपारीक दागिना असून तुम्ही नऊवारी साडीवर हे दागीने घालू शकता.
9 / 16
मोत्यांच्या ठुशीवर तुम्ही तन्मणी हा दागिना घालू शकता.
10 / 16
जर तुम्हाला फार जास्त दागिने नको असतील तर तुम्ही हा दागिना घातला तरी छान दिसेल.
11 / 16
गळ्यात मंगळसुत्र घालणार नसाल किंवा कोणताही मोठा दागिना नसेल तर तुम्ही बकूळी हार घालू शकता. यामुळे रिच लूक येईल.
12 / 16
मोहनमाळ हा दागिना कोणत्याही खास प्रसंगांसाठी उत्तम पॅटर्न आहे.
13 / 16
तोडे घातल्यानं हाताला शोभा येईल. तोड्यांच्या मागे पुढे तुम्ही बांगड्या घालू शकता.
14 / 16
गुलाबतोडे हातात घातले तर इतर कोणत्याही बांगड्या न घालता तुमचा हात सुंदर दिसेल.
15 / 16
ठुशीचा हा पारंपारीक प्रकार नेहमीच महिलांच्या पसंतीस उतरतो.
16 / 16
पोहेहार हा तुम्ही कोणत्याही काठाच्या साडीवर घालू शकता.
टॅग्स : खरेदीफॅशन