मंगळसूत्राच्या दोन वाट्या, सासरमाहेरची खूण! पाहा लेटेस्ट फॅशनच्या १० सुंदर डिझाइन्स

Updated:December 23, 2024 16:26 IST2024-12-23T15:21:31+5:302024-12-23T16:26:31+5:30

मंगळसूत्राच्या दोन वाट्या, सासरमाहेरची खूण! पाहा लेटेस्ट फॅशनच्या १० सुंदर डिझाइन्स

सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे मंगळसूत्र खरेदी अगदी उत्साहात आहे (maharastrian mangalsutra designs). लग्नात नववधूला जे मोठे मंगळसूत्र घातले जाते, त्यामध्ये इतर कोणतेही पेंडंट न घालता दोन ठसठशीत वाट्याच घातल्या जातात (mangalsutra vati designs of latest fashion). त्या वाट्यांचे असे अनेक नवनविन प्रकार सध्या पाहायला मिळत आहेत.(mangalsutra vati pendant of latest designs)

मंगळसूत्राच्या दोन वाट्या, सासरमाहेरची खूण! पाहा लेटेस्ट फॅशनच्या १० सुंदर डिझाइन्स

नाजूक चांदण्या वाटाव्या तसं हे डिझाईन पाहा. गळ्यात घातल्यावर हे खूप छान दिसेल.

मंगळसूत्राच्या दोन वाट्या, सासरमाहेरची खूण! पाहा लेटेस्ट फॅशनच्या १० सुंदर डिझाइन्स

अशा पद्धतीच्या फुलाचा आकार असणाऱ्या मंगळसूत्र वाट्यांचे अनेक डिझाईन्स सध्या पाहायला मिळत आहेत.

मंगळसूत्राच्या दोन वाट्या, सासरमाहेरची खूण! पाहा लेटेस्ट फॅशनच्या १० सुंदर डिझाइन्स

बारीक कलाकुसर असणाऱ्या अशा जाळीदार वाट्या तरुण मुलींना आवडतील अशाच आहेत. पण वाट्यांवरच्या बारीक जाळीमध्ये धूळ, घाण अडकून त्या लवकर खराब होऊ शकतात. जर तुमचा मोठ्या मंगळसूत्राचा खूप वापर होणार नसेल, तर हे डिझाईन तुम्ही निवडू शकता.

मंगळसूत्राच्या दोन वाट्या, सासरमाहेरची खूण! पाहा लेटेस्ट फॅशनच्या १० सुंदर डिझाइन्स

हे एक स्टोन लावलेलं डिझाईन पाहा. बघताक्षणीच आवडावं असं हे डिझाईन असून तुम्ही ते अमेरिकन डायमंड किंवा रिअल डायमंड अशा दोन्ही प्रकारात घेऊ शकता.

मंगळसूत्राच्या दोन वाट्या, सासरमाहेरची खूण! पाहा लेटेस्ट फॅशनच्या १० सुंदर डिझाइन्स

मंगळसूत्र वाटीचा हा आणखी एक नवा प्रकार. मोठ्या मंगळसूत्रामध्ये तर या वाट्या शोभून दिसतीलच. पण छोट्या मंगळसूत्रातही सुरेख दिसतील.

मंगळसूत्राच्या दोन वाट्या, सासरमाहेरची खूण! पाहा लेटेस्ट फॅशनच्या १० सुंदर डिझाइन्स

सगळ्यांपेक्षा एकदम वेगळं, हटके असं काही घ्यायचं असेल तर हे डिझाईन तुम्हाला आवडू शकतं. यामध्ये मोजक्या शब्दांत विवाहासाठीचा समर्पक संदेश लिहीला आहे.

मंगळसूत्राच्या दोन वाट्या, सासरमाहेरची खूण! पाहा लेटेस्ट फॅशनच्या १० सुंदर डिझाइन्स

या वाटी डिझाईनमध्ये छोटासा रुबी किंवा माणिक लावलेला आहे. त्याऐवजी पाचू, स्टोन, मोती किंवा तुमच्या आवडीच्या रंगाचा एखादा खडा लावूनही तुम्ही ते कस्टमाईज करून घेऊ शकता.

मंगळसूत्राच्या दोन वाट्या, सासरमाहेरची खूण! पाहा लेटेस्ट फॅशनच्या १० सुंदर डिझाइन्स

दक्षिण भारतात नववधूला अशा पद्धतीचं मंगळसूत्र घातलं जातं. त्यांच्याकडे मंगळसूत्रामध्ये काळ्या मण्यांचा वापर नसतो. या वाट्यांचा आकार थोडा वेगळा आहे. अशा पद्धतीच्या वाट्या आपल्याकडच्या नेहमीच्या मंगळसूत्रामध्ये टाकता येऊ शकतात.