मकर संक्रांतीचं वाण देताय? घ्या स्वस्तात मस्त ८ वस्तूंची यादी, सुवासिनीही होतील खूश... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2023 10:22 AM 1 / 10मकर संक्रांत जवळ आली की महिलांना एक प्रश्न पडतो तो म्हणजे हळदी-कुंकवाला वाण म्हणून काय द्यायचं? आपण देत असलेली वस्तू वापरण्याजोगी आणि उपयुक्त असावी असं प्रत्येकीला वाटतं (Makar Sankranti Haldi Kunku Useful Van Ideas).2 / 10इतकेच नाही तर जवळपास ३० ते ४० महिलांना वस्तू द्यायची असल्याने ती आपल्या बजेटमध्ये बसणारी असावी असाही महिलांचा प्रयत्न असतो. आता सगळ्यांना आवडेल, उपयोगी होईल आणि तरीही वेगळी असेल अशा काही गोष्टींची यादी पाहूया.3 / 10अनेकदा आपण संसारोपयोगी वस्तू देतो. मात्र महिलांनी स्वत:च्या आहाराकडे लक्ष द्यावे असे वाटत असेल तर खजूराचे लहान पाकीट द्यावे. यामुळे महिलांचे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होईल.4 / 10थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी पडते आणि फुटते. अशावेळी मॉईश्चरायजर अतिशय गरजेचे असते. थंडीत बहुतांश महिला याचा वापर करतात. त्यामुळे मॉईश्चरायजरचे एखादे लहान पाऊच किंवा बाटली आपण वाण म्हणून नक्की देऊ शकतो. 5 / 10सध्या बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे फेसमास्क उपलब्ध आहेत. एखाद्या कार्यक्रमाला जाताना आपल्याला फेसक्लिनिंगला वेळ मिळाला नाही तर आपणही हे फेसमास्क आवर्जून लावतो. असेच हर्बल आणि सगळ्या स्कीन टाईपला सूट होतील असे फेस मास्क आपण वाण म्हणून देऊ शकतो. 6 / 10नेलपेंट किंवा नेल रिमूव्हर ही महिलांच्या आवडीची गोष्ट आहे. तसंच ही आवश्यक असणारीही गोष्ट आहे. त्यामुळे यातील एक किंवा दोन्ही असे आपण देऊ शकतो. 7 / 10महिला अनेकदा घरातील सगळ्यांची काळजी घेतात. पण स्वत:कडे पुरेसे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतो. त्यामुळे जाता येता खाण्यासाठी बॅगमध्ये ठेवता येतील असे चिक्कीचे पाकीट किंवा प्रोटीन बारचे पाकीट आपण वाण म्हणून देऊ शकतो. 8 / 10कधी मेकअपचे सामान ठेवायला तर कधी पैसे ठेवायला. कधी आणखी काही वस्तू ठेवायला महिलांना पाऊच आवश्यक असतात. हे पाऊच वेगवेगळ्या रंगात, आकारात मिळतात. गरजेची असलेली ही गोष्ट आपण वाण म्हणून नक्कीच देऊ शकतो. 9 / 10थंडीच्या दिवसांत पायांना गार लागू नये म्हणून किंवा एरवीही पाय खराब होऊ नये म्हणून बऱ्याच महिला नियमित सॉक्स वापरतात. बाजारात वेगवेगळ्या रंगांचे सॉक्स मिळतात. यामध्ये साधारणपणे साईजही एक किंवा २ असतात. त्यामुळे सॉक्स हा पर्यायही उपयुक्त ठरु शकतो. 10 / 10रुमाल, नॅपकीन या तर अगदी आवश्यक गोष्टी असतात. महिलांना रोजच्या रोज आणि प्रवासाला जातानाही रुमाल किंवा नॅपकीन लागतात. त्यामुळे २ किंवा ३ रुमाल किंवा नॅपकीनचा सेट आपण वाण म्हणून लुटू शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications