मकर संक्रांतीसाठी काळी साडी घ्यायचा विचार करताय? पाहा स्वस्तात मस्त एक से एक पॅटर्न्स

Published:January 3, 2023 04:21 PM2023-01-03T16:21:14+5:302023-01-03T16:25:29+5:30

Makar Sankranti Shopping Saree Patterns : काळ्या रंगाची साडी घेण्याचा विचार करत असाल तर बाजारात स्वस्तात मस्त असे बरेच पर्याय सध्या उपलब्ध आहेत.

मकर संक्रांतीसाठी काळी साडी घ्यायचा विचार करताय? पाहा स्वस्तात मस्त एक से एक पॅटर्न्स

संक्रांत म्हटले की आपल्याला आठवतात ते तिळगूळ आणि काळ्या रंगाचे कपडे. थंडीच्या दिवसांत आवर्जून घातले जाणारे काळे कपडे आपण एरवी फारसे वापरतोच असे नाही. पण या सणाला काळ्या रंगाचेच महत्त्व असल्याने संक्रांतीसाठी महिला आवर्जून काळी साडी खरेदी करतात (Makar Sankranti Shopping Saree Patterns).

मकर संक्रांतीसाठी काळी साडी घ्यायचा विचार करताय? पाहा स्वस्तात मस्त एक से एक पॅटर्न्स

तुमच्याकडेही काळ्या रंगाची साडी नसेल आणि संक्रांतीच्या निमित्ताने तुम्ही काळ्या रंगाची साडी घेण्याचा विचार करत असाल तर बाजारात स्वस्तात मस्त असे बरेच पर्याय सध्या उपलब्ध आहेत. ते कोणते पाहूया...

मकर संक्रांतीसाठी काळी साडी घ्यायचा विचार करताय? पाहा स्वस्तात मस्त एक से एक पॅटर्न्स

काठापदराच्या साडीला उत्तम पर्याय असलेली सिंपल पण थोडी ट्रेंडी अशी रफल प्रकारातली साडी तुम्ही संक्रांतीसाठी घेऊ शकता. ही साडी पार्टी वेअर म्हणून तुम्हाला वापरता येईल. याचे ब्लाऊज डीझायनर असल्याने तुमचा लूक सगळ्यांमध्ये उठून दिसेल. ही साडी ८०० ते १५०० च्या रेंजमध्ये मिळू शकेल.

मकर संक्रांतीसाठी काळी साडी घ्यायचा विचार करताय? पाहा स्वस्तात मस्त एक से एक पॅटर्न्स

कॉटनच्या प्रिंटेड साडीची सध्या बरीच फॅशन आहे. अंगाला चोपून बसणारी आणि ऑफीस वेअरसाठी परफेक्ट अशी सुती साडी संक्रांतीसाठी चांगला पर्याय ठरु शकतो. यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या प्रिंट उपलब्ध असतात आणि कॉटनमुळे थंडीपासूनही संरक्षण होण्यास मदत होते. अगदी १ हजारापासून या साड्या उपलब्ध आहेत.

मकर संक्रांतीसाठी काळी साडी घ्यायचा विचार करताय? पाहा स्वस्तात मस्त एक से एक पॅटर्न्स

चमचमती दिसणारी या साडीच्या प्रकाराला सेक्विन असे म्हणतात. संध्याकाळच्या वेळी अशाप्रकारची साडी आपल्याला खुलून दिसू शकते. बऱ्याच बॉलिवूड अभिनेत्री एखाद्या पार्टीला या प्रकारची साडी नेसल्याचे दिसते. ही साडी थोडी चमचमत्या प्रकारची असल्याने यावर ज्वेलरी, मेकअप फारसा नाही केला तरी आपला लूक छान दिसतो. याची किंमत थोडी जास्त असली तरी त्याचा लूक खूप सुंदर दिसतो.

मकर संक्रांतीसाठी काळी साडी घ्यायचा विचार करताय? पाहा स्वस्तात मस्त एक से एक पॅटर्न्स

शिफॉन प्रकारातील ही साडी नेसायला तर हलकी असतेच पण चोपून बसत असल्याने आपली फिगरचही यामध्ये चांगली दिसते. नाजूक डीझाइन असलेली साडी आपण संक्रांतीला आणि एखाद्या लहान पार्टीला आवर्जून कॅरी करु शकतो. नाजूक बॉर्डर असल्याने ही साडी अंगावर खुलून दिसते. साधारण १ ते २ हजारच्या रेंजमध्ये ही साडी खरेदी करता येईल.

मकर संक्रांतीसाठी काळी साडी घ्यायचा विचार करताय? पाहा स्वस्तात मस्त एक से एक पॅटर्न्स

पारंपरिक पैठणी ही तर काळ कितीही पुढे आला तरी कायम एव्हर ग्रीन असणारा साडीतला प्रकार आहे. यामध्ये काळ्या रंगासोबत लाल, हिरवा, निळा, मोरपंखी, गोल्डन, सिल्व्हर असे कोणतेही कॉम्बिनेशन छान दिसू शकते. यात अगदी २ हजारांपासून ते १०-१२ हजारांपर्यंतची रेंज उपलब्ध असते.

मकर संक्रांतीसाठी काळी साडी घ्यायचा विचार करताय? पाहा स्वस्तात मस्त एक से एक पॅटर्न्स

ब्रोकेड डिझाईनमध्येही हल्ली बरेच प्रकार पाहायला मिळतात. लहान नाजूक डिझाईनपासून ते भरजरी डीझाईनपर्यंतच्या बऱ्याच साड्या यात येतात. हा प्रकार म्हटला तर पारंपरिक म्हटला तर वेस्टर्न लूक देणारा असतो. अगदी १ हजारपासून ते ७ हजारापर्यंतच्या साड्या यामध्ये येतात.