Makar Sankranti Special Look : Makar Sankranti Special Jwellery Options for Black saree
Makar Sankranti Look : संक्रांतीला काळ्या साडीवर 'हे' युनिक दागिने घाला; १० ऑप्शन्स देतील मॉडर्न लूकPublished:January 13, 2023 07:24 PM2023-01-13T19:24:40+5:302023-01-13T19:50:53+5:30Join usJoin usNext Makar Sankranti Special Look : मकर संक्रांतीला बऱ्याच स्त्रिया काळ्या साड्या नेसतात. आपण युनिक प्रेझेंटेबल दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं.(Makar Sankranti Special) पण काळ्या साडीवर कोणती ज्वेलरी घातल्यानंतर आपण सुंदर, उठून दिसून याची आयडीया येत नाही. काळ्या साडीवर ट्राय करता येतील असे दागिन्यांचे ऑप्श्न्स पाहूया. (Makara Sankranti Jwellery) ऑक्सिडाईज, सिल्वर ज्वेलरी काळ्या साडीसाठी बेस्ट ऑपश्न आहे. कारण काळ्या रंगावर हे दागिने अधिक उठून दिसतात. हिरवं किंवा ट्रांन्सपरंट चोकरसुद्धा तुम्ही घालू शकता. यामुळे जास्त काही न घालता गळा भरलेला दिसेल. जर तुम्ही ऑफिसला काळी नेसून जाणार असाल तर जास्त दागिने न घातला त्यावर फक्त सिंपल क्यूट असा नेकलेस आणि कानातले घालू शकता. घरातल्या सेलिब्रेशनसाठी दागिने घालणार असाल सोनालीप्रमाणे पांरपारीक दागिने कॅरी करू शकता. सिल्वर झुमक्याचे कानातले, गळाभरून हार आणि बांगड्या तुम्हाला परफेक्ट लूक देतील. जर तुम्ही काळ्या साडीवर गोल्डन ब्लाऊज घालणार असाल तर त्यावर गोल्डन किंवा डायमंड ज्वेलरी निवडा टेराकोटा ज्वेलरीची बरीच फॅशन आहे. अनेक कलाकार ही ज्वेलरी हाताने पेंट करत असल्याने त्यामध्ये वेगवेगळ्या बऱ्याच डिझाइन पाहायला मिळतात ऑफिसला जाण्यासाठी तुम्ही काळ्या साडीवर गळ्यात पातळ नेकलेस घालू शकता. सिंपल काळ्या साडीवर तुम्ही जाड मण्याचं मंगळसूत्र किंवा मल्टीलेअर्ड ज्वेलरी घालू शकता. टॅग्स :खरेदीफॅशनमकर संक्रांतीShoppingfashionMakar Sankranti