लग्न-मुंजीसाठी सुंदर मुंडावळी घ्यायच्या? बघा ७ लेटेस्ट डिझाईन्स- मुंडावळ इतकी सुंदर की..
Updated:February 3, 2024 13:23 IST2024-02-03T12:17:05+5:302024-02-03T13:23:36+5:30

आपल्या महाराष्टात लग्नाच्यावेळी नवरदेव आणि नवरी या दोघांनाही मुंडावळी बांधतात. तसेच मौंजीच्या कार्यक्रमात बटूलाही मुंडावळ बांधतात. मुळात मुंडावळ हीच नवरदेव- नवरीची आणि मौंजीतल्या बटूची ओळख असते.
म्हणूनच लग्न- मौंजप्रसंगी अगदी कम्पलसरी असणारा हा दागिना घ्यायचा असेल, तर त्यातले काही नवनविन प्रकार पाहून घ्या. त्याच त्या प्रकारच्या मुंडावळी घेण्यापेक्षा असं काही वेगळं घ्या... नवरदेव- नवरी आणि बटूचा रुबाब नक्कीच वाढेल.
ही एक नव्या पद्धतीची मुंडावळ पाहा. यामध्ये कपाळावर माळांच्या दोन महिरप दिसतात. ठसठशीत दागिन्यांची आवड असणाऱ्यांना हा प्रकार आवडू शकतो.
हल्ली नवरी लग्नप्रसंगाच्या एखाद्या विधीसाठी ऑक्सिडाईज ज्वेलरी घालते. अशा ऑक्सिडाईज दागिन्यांना परफेक्ट मॅच होणारी ऑक्सिडाईज मुंडावळही आता बाजारात मिळते.
कपाळावरची माळ वेगळ्या रंगाची आणि खालच्या लाेंबत्या माळा वेगळ्या रंगाच्या असे प्रकारही आता पाहायला मिळतात. यात खालच्या लोंबत्या माळा ज्या आहेत, त्या तुम्ही तुमच्या कपड्यांच्या रंगानुसार घेऊ शकता.
अशी नाजूक घुुंगरू असणारी मुंडावळही सध्या एकदम ट्रेण्डी आहे. पारंपरिक वेशभुषेवर ती खूप खुलून दिसते.
काही ठिकाणी फुलांच्या मुंडावळी बांधण्याची परंपरा आहे. त्यातही असे आर्टिफिशियल फुलांचे अनेक नवनविन प्रकार बाजारात आले आहेत.