लग्न-मुंजीसाठी सुंदर मुंडावळी घ्यायच्या? बघा ७ लेटेस्ट डिझाईन्स- मुंडावळ इतकी सुंदर की.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2024 12:17 PM 1 / 7आपल्या महाराष्टात लग्नाच्यावेळी नवरदेव आणि नवरी या दोघांनाही मुंडावळी बांधतात. तसेच मौंजीच्या कार्यक्रमात बटूलाही मुंडावळ बांधतात. मुळात मुंडावळ हीच नवरदेव- नवरीची आणि मौंजीतल्या बटूची ओळख असते.2 / 7म्हणूनच लग्न- मौंजप्रसंगी अगदी कम्पलसरी असणारा हा दागिना घ्यायचा असेल, तर त्यातले काही नवनविन प्रकार पाहून घ्या. त्याच त्या प्रकारच्या मुंडावळी घेण्यापेक्षा असं काही वेगळं घ्या... नवरदेव- नवरी आणि बटूचा रुबाब नक्कीच वाढेल.3 / 7ही एक नव्या पद्धतीची मुंडावळ पाहा. यामध्ये कपाळावर माळांच्या दोन महिरप दिसतात. ठसठशीत दागिन्यांची आवड असणाऱ्यांना हा प्रकार आवडू शकतो.4 / 7हल्ली नवरी लग्नप्रसंगाच्या एखाद्या विधीसाठी ऑक्सिडाईज ज्वेलरी घालते. अशा ऑक्सिडाईज दागिन्यांना परफेक्ट मॅच होणारी ऑक्सिडाईज मुंडावळही आता बाजारात मिळते.5 / 7कपाळावरची माळ वेगळ्या रंगाची आणि खालच्या लाेंबत्या माळा वेगळ्या रंगाच्या असे प्रकारही आता पाहायला मिळतात. यात खालच्या लोंबत्या माळा ज्या आहेत, त्या तुम्ही तुमच्या कपड्यांच्या रंगानुसार घेऊ शकता. 6 / 7अशी नाजूक घुुंगरू असणारी मुंडावळही सध्या एकदम ट्रेण्डी आहे. पारंपरिक वेशभुषेवर ती खूप खुलून दिसते. 7 / 7काही ठिकाणी फुलांच्या मुंडावळी बांधण्याची परंपरा आहे. त्यातही असे आर्टिफिशियल फुलांचे अनेक नवनविन प्रकार बाजारात आले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications