Navratri 2022 : Beautiful oxidized mangalsutra designs, Special arrival for festive season
Navratri 2022 : ऑक्सिडाईज मंगळसूत्रांचे पहा १० स्टायलिश प्रकार, एक से एक डिझाइन्स! नवरात्रासाठी खास..Published:September 21, 2022 05:56 PM2022-09-21T17:56:13+5:302022-09-21T18:02:44+5:30Join usJoin usNext १. सोनेरी मणी असणारं किंवा मग स्टाेनचं पेंडंट असणारं आर्टिफिशियल मंगळसूत्र आपण नेहमीच घालतो. आता यंदाच्या नवरात्रीसाठी काहीतरी खास आणि वेगळं घ्या.. आर्टिफिशियल मंगळसूत्रांमध्ये सध्या ऑक्सिडाईज मंगळसूत्रांना चांगलीच मागणी आहे. त्याचेच हे काही खास प्रकार. २. दसरा- दिवाळी या सणांनिमित्त सध्या आपल्या शहरातल्या लोकल बाजारात तसेच ऑनलाईन शॉपिंग साईटवर ऑक्सिडाईज प्रकारातले अनेक मंगळसूत्र उपलब्ध आहेत. खणाच्या साड्यांची क्रेझ होती तेव्हा फक्त साडीवर शोभणारे ठसठशीत ऑक्सिडाईज मंगळसूत्र मिळायचे. ३. पण आता मात्र ऑक्सिडाईज मंगळसूत्रांमध्ये अनेक नाजूक प्रकार उपलब्ध आहेत. अगदी जीन्सवरही तुम्ही ते घातले तरी ते बिलकूल वेगळं दिसणार नाही ४. फक्त असा एक मोठा मणी आणि काळ्या मण्यांची पोत अशा प्रकारचं हे मंगळसूत्र एखाद्या कॉटनच्या साडीप्रमाणेच ड्रेसवरही शोभून दिसतं. ५. त्यातलाच हा एक प्रकार. यातले पेंडंट आणि गळ्यातली पोत हे दोन्हीही आणखीनच नाजूक आहेत. ऑनलाईन शॉपिंग साईटवर १५० ते २०० रुपयांत हे मंगळसूत्र मिळते आहे. ६. या मंगळसूत्रात वाट्यांच्या ऐवजी दोन सुंदर फुलं वापरण्यात आली आहेत. तशाच प्रकारचे कानातले घेतले तर तो एक सुंदर सेट तुमच्याकडे होऊ शकतो. ७. नथीचं डिझाईन असणारं पेंडंट असा प्रकार आपण आपल्या रेग्युलर मंगळसूत्रांमध्ये नेहमीच बघतो. आता हा प्रकार ऑक्सिडाईज मंगळसूत्रांमध्येही बघायला मिळत आहे. ८. नाजूक पेंडंट प्रकारातलं हे आणखी एक सुंदर डिझाईन. लोकल मार्केटमध्ये अगदी १०० रुपयांपासून यातले वेगवेगळे प्रकार मिळू शकतात. ९. अशा पद्धतीचं मंगळसूत्र एखाद्या कॉटन किंवा प्लेन साडीवर घातलं तर तुम्ही नक्कीच अधिक ट्रेण्डी दिसू शकता. सणासुदीच्या दिवसांत ऑफिसमध्ये साडी नेसून जाण्याचा प्लॅन असेल, तर असं एखादं मंगळसूत्र आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवं.टॅग्स :खरेदीब्यूटी टिप्सफॅशनदागिनेShoppingBeauty Tipsfashionjewellery