Join us   

नवरात्री २०२४: रंगीलो म्हारो घागरो..! गरबा- दांडियासाठी घ्या सुंदर घागरे-पाहा यंदाचे लेटेस्ट डिझाइन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2024 3:45 PM

1 / 7
नवरात्रीला आता अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे तरुणाई सध्या दांडिया- गरबा खेळण्याच्या तयारीला लागली आहे.. यंदा दांडिया किंवा गरब्यासाठी लेटेस्ट पॅटर्नचे लेहेंगा, घागरे घ्यायचे असतील (lehenga patterns for navaratri) तर हे काही युनिक पॅटर्न्स एकदा बघून घ्या.. (Navratri 2024)
2 / 7
संपूर्ण प्रिंट असलेला हा सिल्क घागरा खूप छान लूक देतो (ghagra for dandiya and garba). शिवाय हा घागरा तुम्ही दांडिया व्यतिरिक्त अन्य ठिकाणीही घालू शकता. जेणेकरून त्याचा बराच वापर होतो. (simple and attractive traditional chaniya choli patterns)
3 / 7
हा एक घागरादेखील त्याच प्रकारचा. हल्ली कॉन्ट्रास्ट शेडपेक्षा ब्लाऊज, ओढणी, घागरा असे सगळे एकाच शेडमधले असणारे घागरे जास्त ट्रेण्डिंग आहेत. यामध्ये तुमच्या आवडीनुसार वाटेल तेवढे रंग मिळू शकतात.
4 / 7
घागऱ्याचा हा एक अगदी नवा प्रकार बघा. हा घागरा दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. असा पॅटर्नही सध्या इन आहे.
5 / 7
असा कलमकारी वर्कचा घागराही तुम्ही घेऊ शकता. हा घागरा कॉटनचा असल्याने दांडिया खेळण्यासाठी अधिक आरामदायी सुद्धा आहे. यावर तुम्ही छानसे ऑक्सिडाईज दागिने घातले की अगदी आकर्षक लूक मिळेल. शिवाय दांडिया किंवा गरबा व्यतिरिक्त तुम्ही अन्य समारंभातही असे घागरे घालू शकता.
6 / 7
असा टिपिकल राजस्थानी लूक देणारा घागरा तर नेहमीच सगळ्यांचं लक्ष आकर्षून घेतो. यावर दागदागिन्यांचं कॉम्बिनेशन मात्र मस्त जमून आलं पाहिजे.
7 / 7
हेवी वर्क असणारे घागरे आवडत असतील तर अशा प्रकारच्या घागऱ्यांचाही तुम्ही विचार करू शकता. ऑनलाईन शॉपिंग साईटवर किंवा मग तुमच्या शहरातल्या बाजारपेठांमध्येही अशा प्रकारचे अनेक घागरे वेगवेगळ्या रंगांमध्ये मिळू शकतात.
टॅग्स : खरेदीफॅशननवरात्रीगरबादांडियास्टायलिंग टिप्स