लग्नकार्यात घालण्यासाठी पाहिजेतच ठसठशीत पाटल्या- ७ सुंदर डिझाईन्स, हाताला येईल शाही लूक..
Updated:January 18, 2025 16:21 IST2025-01-18T16:17:41+5:302025-01-18T16:21:50+5:30

लग्नकार्य असलं की अगदी हातभर बांगड्या घातल्या जातात. त्या बांगड्यांमध्ये सगळ्यात मागे पाटल्या आणि त्यानंतर काचेच्या बांगड्यांमध्ये दोन सोन्याच्या बांगड्या.. अशा पद्धतीने अनेकजणी बांगड्या घालतात.(patli bangle designs)
हातात ठसठशीत पाटल्या असल्या की हात कसा घरंदाज, राजेशाही दिसू लागतो (latest pattern patli bangle for marathi wedding). त्यामुळेच लग्नकार्यानिमित्त तुम्हालाही पाटल्यांची खरेदी करायची असेल तर हे काही सुंदर डिझाईन्स पाहा..(marathi jewellery patli bangles)
कोणतंही कोरीव काम नसलेल्या अशा प्लेन पाटल्याही अनेकजणींना खूप आवडतात. यामुळे हाताला अगदी डिसेंट लूक येतो.
हल्ली पाटल्या- बांगड्यांच्या सेटमध्ये असे नवनविन डिझाईन्स येत आहेत. कोरीव काम केलेल्या पाटल्या हातात खूप सुंदर दिसतात.
पाटल्यांचं हे आणखी वेगळं आणि सध्या खूप ट्रेण्डमध्ये असणारं डिझाईन पाहा.. या पाटल्या तुम्ही कडं किंवा गोठ म्हणूनही हातात घालू शकता.
जाडसर, ठसठशीत पाटल्या आवडत असतील तर हे एक डिझाईन छान आहे.
अगदी पारंपरिक धाटणीच्या रेखीव पाटल्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला हे डिझाईन आवडू शकतं.
पाटल्यांमध्ये हल्ली असं डिझाईनही खूप पाहायला मिळत आहे. यांचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही काचेच्या बांगड्या न घालता ही नुसती एकेक पाटली हातात घातली तरी ती खूप छान दिसते.