प्रजासत्ताक दिनाला टिपिकल लूक न करता; १० रंगाच्या ब्लाऊजवर नेसा पांढरी साडी; स्टायलिश दिसाल
Updated:January 24, 2025 18:30 IST2025-01-24T17:48:04+5:302025-01-24T18:30:13+5:30
Republic Day 2025 : पांढऱ्या साडीवर पांढरे ब्लाऊज असा टिपिकल लूक न करता तुम्ही वेगळ्या रंगाचे ब्लाऊज ट्राय करू शकता. ज्यामुळे तुम्ही अधिक स्टायलिश, युनिक दिसाल.

प्रजासत्ताक दिनाला (Republic Day 2025) बरेचजण पांढऱ्या किंवा ऑफ व्हाईट रंग, मोती रंगाची साडी नेसणं पसंत करतात तर काहीजण तिरंग्याच्या ३ रंगापैकी कोणत्याही २ रंगाचे कॉम्बिनेशन असलेली साडी किंवा ड्रेस घालणं पसंत करतात. (Republic Day Special Look Indian Republic Day)
पांढऱ्या साडीवर पांढरे ब्लाऊज असा टिपिकल लूक न करता तुम्ही वेगळ्या रंगाचे ब्लाऊज ट्राय करू शकता. ज्यामुळे तुम्ही अधिक स्टायलिश, युनिक दिसाल.
स्लिव्हजलेस किंवा लॉन्ग हॅण्ड्संच ब्लाऊज पांढऱ्या साडीवर सुंदर दिसेल.
पांढऱ्या रंगाची साडी पर्पल रंगाच्या ब्लाऊजवर चांगली दिसते.
आकाशी रंगाच्या ब्लाऊजवर तुम्ही पांढरी साडी नेसू शकता.
गुलाबी आणि पांढरे हे कॉम्बिनेशनही सुंदर दिसते. हे कॉम्बिनेशन तुम्हाला सहज ट्राय करता येईल.
काळ्या रंगाच्या ब्लाऊजवर पांढरी साडी सगळ्यात जास्त उठून दिसेल.
तुम्ही ब्लाऊजच्या रंगाचे मणी असलेले नेकलेस गळ्यात घालू शकता.
फूल स्लिव्हजचं लाल ब्लाऊज आणि कॉटनची पांढरी चांगली हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे.
(Image credit-Social Media)