स्वयंपाकघर डेकोरेट करण्याच्या सोप्या, स्वस्तात मस्त आयडिया; फक्त 1000 रुपयांत किचनला द्या नवा लूक By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2022 5:53 PM 1 / 9१. स्वयंपाक घर हे महिलांचंं घरातलं हक्काचं ठिकाण.... घर कसं सजवायचं हे घरातल्या इतर मंडळींच्या हातात असलं तरी स्वयंपाक घराचं डेकोरेशन करताना सगळी मर्जी चालते ती घरातल्या बाईची.. म्हणूनच तुमची ही हक्काची जागा अशी छान डेकोरेट करा की स्वयंपाक घरातलं काम म्हणजे तुमच्यासाठी एन्जॉयमेंट असेल, काम करताना तिथे तुमचं मन रमेल...2 / 9२. असं म्हणतात की स्वयंपाक करताना त्या बाईचं मन प्रसन्न असेल, तर तिच्या हातचं अन्न खाऊन आपोआपच सगळं घर प्रसन्न होतं.. त्यामुळेच स्वयंपाक घरात आल्यावर तुम्हाला छान फ्रेश वाटायला हवं. म्हणूनच स्वयंपाक घरात भरपूर लाईट लावण्याची व्यवस्था करून घ्या.. भरपूर उजेड असला की आपोआपच छान फिलिंग येतं.3 / 9३. घरात जर जिवंत झाडं ठेवली तर घर लाईव्ह वाटू लागतं. तसंच आपल्या स्वयंपाक घराचंही आहे. ओट्याजवळच्या खिडकीत किंवा डायनिंग टेबलवर किंवा मग स्वयंपाक घरातला असा एखादा कॉर्नर जिथे चांगला स्वच्छ प्रकाश येतो, तेथे तुम्ही एखादं इनडोअर प्लान्टचं रोपटं ठेवलं, तर तुमचं स्वयंपाकघर खरोखरंच लाईव्ह वाटू लागेल..4 / 9४. स्वयंपाक घरात ओला कचरा कायम तयार होत असतो. हा कचरा तसाच उघड्यावर किंवा ओट्यावरच्या एखाद्या भांड्यात पडू दिला तर ते अजिबातच चांगलं दिसत नाही. त्यामुळे स्वयंपाक घरात सिंकच्या खाली कचरा टाकायला अशा पद्धतीची अरेंजमेंट करून घ्या. यामुळे स्वयंपाक घरात अजिबात कचरा दिसणार नाही. ही बॅग रोज बदलायला मात्र विसरू नका. 5 / 9५. स्वयंपाक घरातल्या ज्या बरण्या किंवा डबे लगेच दिसतात त्या बरण्या सगळ्या एकसारख्या घ्या. तिखट, मीठ, मसाले, हळद यांचे डबे एकसारखे, सोप, सुपारी, लवंग, विलायची अशा सामानाच्या डब्या एकसारख्या ठेवा. एकसारख्या डब्यांमुळे, बरण्यांमुळे घर खूप आखिव- रेखीव दिसू लागतं. 6 / 9६. आपण फर्निचर एकदाच करतो आणि ते पुन्हा पुन्हा बदलत नाही. त्यामुळे किचन ट्रॉलींचा एकच एक रंग पाहून कधीकधी आपणंही वैतागतो. पुन्हा फर्निचर करण्याची इच्छा नसेल पण किचन ट्रॉलीचा रंग मात्र बदलायचा असेल तर एक सोपी युक्ती करा. बाजारात आता वॉटर आणि ऑईलप्रुफ वॉलपेपर मिळतात. हे वॉलपेपर तुमच्या सगळ्या किचन ट्रॉलीच्या दरवाजांना लावून टाका. १००० रूपयांपेक्षाही कमी किमतीत स्वयंपाक घराचा सगळा लूक बदलल्यासारखे वाटेल..7 / 9७. आजकाल घर सजविण्यासाठी जसे शोपीस मिळतात, तसेच स्वयंपाक घर सजविण्यासाठीही मिळतात. असे शोपीस ऑनलाईन साईटवर अवघ्या २००- ३०० रूपयांत उपलब्ध आहेत. यापैकी काही शोपीस घ्या आणि स्वयंपाकघरातल्या मोकळ्या भिंतींवर लावा. यामुळे तुमच्या किचनचा लूक नक्कीच बदलेल. 8 / 9८. स्वयंपाक घरात नॅपकिन अडकविण्यासाठी किंवा काही गोष्टी लटकविण्यासाठी हँगर असतात. या हँगर ऐवजी जर असे शोपीस असणारे हुक वापरले तर नक्कीच ते अधिक आकर्षक दिसतील. ३०० ते ४०० रूपयांत ते ऑनलाईन मिळू शकतात.9 / 9९. मिक्सर, मायक्रोवेव्ह, हॅण्डमिक्सी, इंडक्शन अशा अनेक इलेक्ट्रिक गोष्टी स्वयंपाक घरात असतात. वस्तू अनेक आणि प्लग मात्र एकच असेही होते. म्हणूनच सध्या ज्या वस्तूंचे वायर कनेक्ट केलेले नसतात, ते तुम्ही अशा पद्धतीने अडकवून ठेवू शकता. हे शोपीस स्वयंपाक घरात खूपच देखणे आणि स्टायलिश दिसते, यात वादच नाही. ४०० ते ५०० रूपयांत ते ऑनलाईन मिळू शकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications