Join us   

दिवाळी : कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र जास्त शोभून दिसतं? पाहा, नेमकं कधी काय घालावं..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 9:29 AM

1 / 8
सणासुधीच्या काळात महिला साडी नेसण्याला प्राधान्य देतात. कोणत्या साडीवर कोणत्या प्रकारचे दागिने सुट होतील याची आयडीया प्रत्येकीला असते असं नाही.
2 / 8
जसं की सिल्कच्या, काठापदराच्या, ऑर्गेंजा, शिफॉन, जॉर्जेट, फॅन्सी अशा वेगवेगळ्या साड्या सणासुधीला नेसल्या जातात. कोणत्या साडीवर कोणतं मंगळसुत्र घालायचं ते माहीत असेल तर तुमचा लूक अधिकच खुलून येईल.
3 / 8
जर की तुम्ही काठापदराची किंवा गोल्डन काठ असलेली साडी नेसत असाल तर गोल्डन पारंपारीक मंगळसुत्र घाला.
4 / 8
ऑर्गेंजा किंवा पार्टी वेअरची साडी असेल काळे मणी आणि खड्याचं पेंडंट असलेलं मंगळसुत्र घाला.
5 / 8
खणाच्या साडीवर ऑक्साईड मंगळसुत्र शोभून दिसतं. सध्या ऑक्साईड ज्वेलरीचा बराचे क्रेझ पाहायला मिळतो.
6 / 8
सर तुम्ही साधी प्लेन साडी नेसणार असाल तर छोटं गोल्डन मंळसुत्र घालू शकता.
7 / 8
कॉटनच्या सिंपल साड्यांवर छोटं ऑक्साईड मंगळसुत्र छान दिसेल.
8 / 8
सणासुधीच्या काळात बाहेर समारंभाला जाण्यासाठी मोठ्या मंगळसुत्राबरोबर गळ्यातल्या हारांचा सेट घालायला विसरू नका.
टॅग्स : फॅशनदिवाळी 2024स्टायलिंग टिप्सखरेदी