1 / 10१. उन्हाळा म्हटला की गॉगल लावणं अत्यावश्यक होऊन जातं.. बाहेर उष्णता आणि ऊनच एवढं असतं की डोळ्यांना भयंकर त्रास होतो. त्यामुळे डोळ्यांना सुरक्षित ठेवायचं असेल, तर घराबाहेर पडताना उत्तम दर्जाच्या गॉगलचा वापर करा, असं डॉक्टर आवर्जून सांगतात.2 / 10२. त्यामुळे उन्हाळ्यात हमखास एखाददुसरा गॉगल घेतलाच जाताे. त्यातल्या त्यात जे गॉगलेचे शौकिन असतात, त्यांचं तर विचारायलाच नको.. प्रत्येक कपड्यांनुसार, प्रसंगानुसार त्यांचं गॉगल सिलेक्शन ठरलेलं असतं.3 / 10३. उन्हाळ्यात मोठे, संपूर्ण डोळा झाकणारे गॉगल घ्यावेत, असा सल्ला दिला जातो. अशावेळी तुम्ही अशा प्रकारचा मोठा गॉगल निवडू शकता. यामुळे डोळ्यांना पुर्ण सुरक्षा मिळेल.4 / 10४. आलिया भटच्या गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाची सध्या जबरदस्त चर्चा आहे. त्यामुळे तिने या चित्रपटात जो गॉगल लावला आहे, त्याचा बराच शोध सध्या गॉगलप्रेमींकडून घेण्यात येत आहे. त्यामुळे ट्रेण्डी गॉगल पाहिजे असेल तर तुम्ही याचा विचार करू शकता. 5 / 10५. करिनाचा हा गॉगल सूपरकुल आहे.. संपूर्ण डोळा तर झाकला जातोच, शिवाय गॉगलने तिचा लूकही पुर्णपणे बदलून टाकला आहे. उन्हाळी सुटीत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन असेल तर असा एखादा गॉगल तुमच्या कलेक्शनमध्ये हवाच..6 / 10६. कॅट आय चष्मा किंवा गॉगलची फॅशन जुनी असली तरी अजूनही चांगलीच ट्रेंण्डिंग आहे. त्यामुळे आवडत असेल तर या सिझनमध्येही तुम्ही त्याचा विचार नक्की करू शकता. 7 / 10७. सोनम कपूरने लावलेला हा षटकोनी गॉगलही जबरदस्त आहे.. त्रिकोण, चौकोन, षटकोन, डायमंड शेप सध्या गॉगल फॅशनमध्ये ट्रेण्डी आहेत. काही तरी वेगळं, हटके घ्यायचं असेल तर नक्की अशा प्रकारचा विचार करा. 8 / 10८. गाेलाकार चष्मे जसे सध्या इन आहेत, तसेच या आकाराचे गॉगलही चांगलाच भाव खाऊन जात आहेत. बघा हिनाचा हा लूक आवडला असेल तर तिच्यासारखा गॉगल घेऊन टाका. 9 / 10९. ब्राऊन, ब्लॅक, ब्लू अशा डार्क शेडचे गॉगल नको असतील, तर अशा पद्धतीच्या लाईट शेड ग्लासेसचाही तुम्ही विचार करू शकता.10 / 10१०. फक्त गॉगल घेताना जेवढा विचार तुम्ही स्टाईलचा करता, त्यापेक्षा खूप जास्त विचार तुमच्या डोळ्यांचा करा. त्यामुळे गॉगल घेताना तो नेहमी चांगल्या दर्जाचा घ्या. गुणवत्तेच्या बाबतीत अजिबातच तडजोड नको.