लग्न- समारंभात गळ्यात हवाच असा ठसठशीत मोत्याचा दागिना, बघा तन्मणीचे ८ मनमोहक डिझाईन्स... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2024 3:49 PM 1 / 10चिंचपेटी आणि तन्मणी हे दोन मोत्याचे पारंपरिक मराठमोळे दागिने. यापैकी एकच दागिना गळ्यात असेल तरी तो ठसठशीत दिसतो. 2 / 10लग्नसराईनिमित्त तन्मणी घ्यायचा असेल तर हे बघा तन्मणीचे काही लेटेस्ट, फॅशनेबल प्रकार. हा तन्मणीचा प्रकार अतिशय वेगळा आहे.3 / 10लहान मुलींसाठी खरेदी करायची असेल तर असा तीन खड्यांचा तन्मणी छान दिसेल.4 / 10 तन्मणी ३, ५ आणि ७ खड्यांचे असतात. भरगच्च दागिन्यांची आवड असेल तर असा ७ खड्यांचा तन्मणी तुम्हाला आवडू शकतो. 5 / 10ऑक्सिडाईज दागिन्यांची क्रेझ अजूनही आहेच. त्यामुळे असा ऑक्सिडाईज प्रकारातला तन्मणी तुम्ही घेऊ शकता.6 / 10तन्मणीचं पेंडंट असलेलं असं मंगळसूत्रही तुम्ही घेऊ शकता.7 / 10तन्मणी पेंडंट मंगळसूत्रात असणारा हा एक प्रकारही बराच ट्रेण्डिंग आहे. साडी नेसून थोडा मॉडर्न, स्टायलिश लूक करायचा असेल तर हे गळ्यातलं छान वाटेल.8 / 10साडीच्या रंगानुसार असा एखादा तन्मणीही तुम्ही घेऊ शकता.9 / 10तन्मणी हा टिपिकल मोत्यांचा दागिना म्हणून ओळखला जाते. पण हल्ली अशा प्रकारचेही तन्मणी मिळतात.10 / 10तन्मणीचा हा प्रकारही एकदम लेटेस्ट आहे. लग्नकार्यात हा छान शोभून दिसतो. आणखी वाचा Subscribe to Notifications