टेम्पल डिझाइन मंगळसूत्राचे पाहा १० नवेकोरे प्रकार, कुठल्याही ड्रेसवर दिसते शोभून आणि ठसठशीत
Updated:March 21, 2025 17:27 IST2025-03-21T14:56:01+5:302025-03-21T17:27:44+5:30

मंगळसूत्र म्हटलं की त्याला पेंडंट किंवा वाट्या आल्याच. पण सध्या मात्र टेम्पल डिझाईन मंगळसूत्र पेंडंटची खूप क्रेझ आहे.
आपल्याला माहितीच आहे की टेम्पल ज्वेलरी हा प्रकार सध्या खूप ट्रेडिंग आहे. त्यातच आता टेम्पल डिझाईन मंगळसूत्र हा प्रकारही पाहायला मिळतो.
यामध्ये मंगळसूत्रांच्या पेंडंटवर ठसठशीत टेम्पल डिझाईन केलेलं असतं. यालाच साऊथ ज्वेलरी मंगळसूत्र म्हणूनही ओळखलं जातं.
टेम्पल डिझाईन मंगळसूत्राचं वैशिष्ट्य असं की त्याच्या पेंडंटवर राम, कृष्ण, लक्ष्मी, सरस्वती, बालाजी अशा वेगवेगळ्या देवांच्या नाजुक मूर्ती कोरलेल्या असतात.
बासरी वाजवणाऱ्या कृष्णाची ही एक लोभस मुर्ती बघा..
राम, लक्ष्मण, सीता या तिघांच्याही सुंदर मुुर्ती असलेले हे एक पेंडंट पाहताक्षणीच लक्ष वेधून घेणारे आहे.
टेम्पल डिझाईन मंगळसूत्रांमध्ये लक्ष्मीचं पेंडंट असणाऱ्या बऱ्याच डिझाईन पाहायला मिळतात.
अशा प्रकारचे मंगळसूत्र तुम्ही सोन्यातही घडवून घेऊ शकता किंवा तुमच्या शहरातल्या स्थानिक बाजार पेठांमधूनही त्याची खरेदी करू शकता.
ऑनलाइन शॉपिंग साईटवर तर अगदी २५० रुपयांपासून खूप सुंदर प्रकारचे टेम्पल डिझाईन मंगळसूत्र मिळतात.
असं एखादं ठसठशीत मंगळसूत्र गळ्यात घातलं की इतर कोणत्याही दुसऱ्या दागिन्याची गरज पडत नाही.