लग्नसराईत साडी खरेदी करताना साड्यांचे हे ८ पारंपरिक प्रकार माहिती पाहिजेच.. बघा, तुमच्याकडे आहेत का या साड्या?

Published:November 11, 2022 03:00 PM2022-11-11T15:00:30+5:302022-11-11T15:05:25+5:30

लग्नसराईत साडी खरेदी करताना साड्यांचे हे ८ पारंपरिक प्रकार माहिती पाहिजेच.. बघा, तुमच्याकडे आहेत का या साड्या?

१. लग्नसराईदरम्यान पारंपरिक काठपदर साड्यांची खरेदी केलीच जाते. रिसेप्शन, मेहंदी अशा कार्यक्रमांना डिझायनर साडी, लेहेंगा, वन पिस असं घालायचं ठरवलं तरी लग्नात कशी पारंपरिक धाटणीचीच साडी हवी.. म्हणूनच तर लग्नसराईसाठी ट्रॅडिशनल लूक देणारी साडी खरेदी करणार असाल, तर या पारंपरिक साड्या एकदा बघा आणि मग त्यांच्यापैकी कोणती घ्यायची ते ठरवा.

लग्नसराईत साडी खरेदी करताना साड्यांचे हे ८ पारंपरिक प्रकार माहिती पाहिजेच.. बघा, तुमच्याकडे आहेत का या साड्या?

२. साड्यांची महाराणी पैठणी ही तर बहुतांश लग्नांमध्ये दिसतेच. तिच्याशिवाय लग्नसोहळा अपूर्णच असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हल्ली पैठणीमध्ये लोटस पैठणी, डॉलर पैठणी, बालगंधर्व पैठणी, पेशवाई पैठणी, महाराणी पैठणी हे प्रकारही मिळत आहेत.

लग्नसराईत साडी खरेदी करताना साड्यांचे हे ८ पारंपरिक प्रकार माहिती पाहिजेच.. बघा, तुमच्याकडे आहेत का या साड्या?

३. तामिळनाडूची कांजीवरम साडी म्हणजे गर्भरेशमी काठ आणि अतिशय तलम पोत असणारी. अनेक नववधू हमखास ही साडी घेतात. कांजीवरम साडीला दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये ब्राईडल सिल्क साडी म्हणूनही ओळखलं जातं.

लग्नसराईत साडी खरेदी करताना साड्यांचे हे ८ पारंपरिक प्रकार माहिती पाहिजेच.. बघा, तुमच्याकडे आहेत का या साड्या?

४. बनारसी साडी म्हणजेच शालू. लग्न लावण्याच्या प्रसंगी नववधू शालू नेसण्यास प्राधान्य देतात. अतिशय हेवी वर्क हे या साडीचं वैशिष्ट्य. आपल्याकडे आजही नवी नवरी शालूमध्येच दिसते. काही जणी आता शालूऐवजी पैठणी नेसण्यास प्राधान्य देत आहेत. ४- ५ हजारांमध्येही चांगल्या प्रकारची बनारसी साडी मिळू शकते.

लग्नसराईत साडी खरेदी करताना साड्यांचे हे ८ पारंपरिक प्रकार माहिती पाहिजेच.. बघा, तुमच्याकडे आहेत का या साड्या?

५. कसावू साडी ही केरळमधली प्रसिद्ध साडी. नववधू लग्नात ही साडी हमखास नेसते. चमकदार मोतिया रंगाची साडी आणि त्याला सोनेरी काठ अशा पद्धतीची ही सिल्कची साडी असते.

लग्नसराईत साडी खरेदी करताना साड्यांचे हे ८ पारंपरिक प्रकार माहिती पाहिजेच.. बघा, तुमच्याकडे आहेत का या साड्या?

६. उपाडा सिल्क ही आंध्र प्रदेशची निर्मिती असणारी साडी भारतभर प्रसिद्ध आहे. जमदानी साडीचं अधुनिक रूप म्हणून उप्पाडा साडी ओळखली जाते. कारण तिच्यावर खूप अधिक प्रमाणात जरीकाम केलेलं आहे. सिल्क किंवा कॉटन सिल्क या दोन्ही प्रकारात ही साडी मिळते.

लग्नसराईत साडी खरेदी करताना साड्यांचे हे ८ पारंपरिक प्रकार माहिती पाहिजेच.. बघा, तुमच्याकडे आहेत का या साड्या?

७. नारायण पेट ही साडी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दिसून येते. काठावरून जशी पैठणी ओळखता येते, तशीच नारायण पेटही तिच्या काठावरून ओळखली जाते. कारण तिच्या काठांवर विशिष्ट प्रकारचे त्रिकोणी डिझाईन असते.

लग्नसराईत साडी खरेदी करताना साड्यांचे हे ८ पारंपरिक प्रकार माहिती पाहिजेच.. बघा, तुमच्याकडे आहेत का या साड्या?

८. म्हैसूर सिल्क ही कर्नाटकची ओळख. कॉटन सिल्क या प्रकारात साडी उपलब्ध असते. या साडीचे काठ तुलनेने लहान असतात आणि त्यावर नाजूक बुट्टी असते.

लग्नसराईत साडी खरेदी करताना साड्यांचे हे ८ पारंपरिक प्रकार माहिती पाहिजेच.. बघा, तुमच्याकडे आहेत का या साड्या?

९. इरकल साडी कॉटन आणि सिल्क या दोन्ही प्रकारात उपलब्ध असते. अगदी चापूनचोपून बसणारी आणि टिपिकल लूक देणारी साडी म्हणून इरकल साडी ओळखली जाते. अगदी ५०० रूपयांपासून या साड्यांचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.