लग्नाची खरेदी करताना लक्षात ठेवा ५ गोष्टी; ऐनवेळी होणार नाही तारांबळ... Published:November 13, 2022 05:18 PM 2022-11-13T17:18:18+5:30 2022-11-13T17:47:53+5:30
Tips for Perfect Wedding Shopping : वेळीच योग्य ती काळजी घेतली तर लग्नाच्यावेळी आपली तारांबळ होत नाही. यासाठी कोणकोणत्या गोष्टींची तयारी करायला हवी याविषयी... लग्नाची खरेदी म्हणजे नवऱ्या मुलीला असंख्य गोष्टींची जमवाजमव करायची असते. यामध्ये लग्नाच्या कपड्यांपासून ते लग्नानंतर लागणाऱ्या लहानमोठ्या वस्तूंपर्यंत अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. वेळीच योग्य ती काळजी घेतली तर लग्नाच्यावेळी आपली तारांबळ होत नाही. यासाठी कोणकोणत्या गोष्टींची तयारी करायला हवी याविषयी (Tips for Perfect Wedding Shopping)...
लग्नाचे कपडे आणि दागिने आपण घेतोच पण ऐनवेळी आपल्याला लागतात अशा अनेक गोष्टी असतात. यामध्ये आतल्या कपड्यांपासून ते नॅपकीन, टॉवेल अशा लहानमोठ्या गोष्टींचा समावेश असतो. या गोष्टींची नीट यादी करुन त्यांची वेळीच खरेदी केलेली केव्हाही चांगली.
लग्नात लागणाऱ्या गोष्टी आपण आठवणीने आणि व्यवस्थितपणे खरेदी करतो. पण लग्नानंतर आपल्याला कोणाकडे जाण्या-येण्यासाठी चांगले कपडे लागू शकतात. त्यामुळे हलकेफुलके पण चांगले पंजाबी सूट आवर्जून खरेदी करुन ठेवायला हवेत.
आपल्याला घरात घालण्यासाठीही चांगल्या कपड्यांची आवश्यकता असते. त्यातही लग्नानंतर घरात जास्त माणसं असतील तर चांगले कॉटनचे पंजाबी सूट किंवा चांगले गाऊन नाहीतर नाईट सूट आवर्जून खरेदी करुन ठेवायला हवेत.
नवीन लग्न करुन एखाद्या घरी गेल्यावर आपल्या सगळ्याच गोष्टींकडे प्रत्येकाचे बारकाईने लक्ष असते. अशावेळी आपण कॅरी करत असलेली बॅग, आपले फूटवेअर, घरात घालण्याच्या स्लिपर्स हेही आपण सगळा विचार करुन आधीच खरेदी करुन ठेवायला हवे.
सेफ्टी पिन्स, कंगवा, क्लीप्स, मेकअपचे सामान, टूथब्रश, बॉडीलोशन, बॉडी वॉश, शाम्पू अशा आपल्याला नियमितपणे लागणाऱ्या लहानमोठ्या वस्तूंची आपण आवर्जून एक वेगळी बॅग तयार ठेवायला हवी. त्यामुळे नवीन घरी गेल्यावर ऐनवेळी आपली तारांबळ होत नाही आणि आपल्याला सगळ्या गोष्टी सहज आपल्या हाताशी मिळतात.