दसऱ्याला हवाच नथीचा नखरा! बघा १ ग्रॅम सोन्याच्या नथींचे सुंदर डिझाईन्स, पाहा कोणती घालायची? By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2023 9:28 AM 1 / 10दसऱ्याच्या दिवशी किंवा लवकरच येणाऱ्या दिवाळीसाठी पारंपरिक मराठी लूक करायचा असेल तर नाकात घालायला सुंदर नथ पाहिजेच.2 / 10म्हणूनच तुमचाही यावर्षी नथ घेण्याचा विचार असेल तर हे काही लेटेस्ट डिझाईन्स बघून घ्या. १ ग्रॅममध्ये या खूप छान नथ उपलब्ध आहेत.3 / 10हे डिझाईन आपल्या पारंपरिक नथसारखंच आहे. फक्त त्याच्या मधोधम असणारी रेषा थोडी वेगळी आहे. अनेकींना टिपिकल नथ डिझाईनच आवडतं. त्या या नथीचा विचार नक्कीच करू शकतात.4 / 10नथीमध्ये मोराचं डिझाईन आपण नेहमीच पाहतो. आता ही मासोळी नथ बघा. सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं घ्यायचं असेल तर हा एक चांगला पर्याय आहे.5 / 10मोराच्या नथीमध्ये हा एक सुंदर प्रकार आला आहे. नथ नाकात घातल्यावर मोराचा पिसारा अगदी ठसठशीत उठून दिसेल.6 / 10मोराच्या डिझाईनमध्ये काही वेगळं पाहायचं असेल तर हा एक प्रकार मिळू शकतो.7 / 10छोटंसं फूल आणि त्याला वेल... हे आणखी एक ठसठशीत डिझाईन. 8 / 10खूप मोठी नथ आवडत नसेल तर या नाजूक नथीचा विचार करू शकता. नाजूक असली तरी ते ट्रेण्डी- स्टायलिश आहे. 9 / 10संपूर्णपणे मोत्याचीच नथ हवी असेल तर हे एक छान डिझाईन आहे. 10 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications