लग्न- साखरपुड्यासाठी कपल रिंग घ्यायच्या? बघा लेटेस्ट स्टाईलच्या १० सुपर ट्रेण्डी डिझाईन्स...
Updated:February 24, 2024 18:00 IST2024-02-24T17:53:41+5:302024-02-24T18:00:06+5:30

लग्न किंवा साखरपुड्यासाठी भावी वधू- वरांना अंगठ्या घ्यायच्या असतील तर हल्ली त्यांची पहिली पसंत कपल रिंगला असते.
तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कुणाला कपल रिंग्स घ्यायच्या असतील तर त्यांना हे काही ट्रेण्डी डिझाईन्स पाहून ठेवा.
त्याच्या अंगठीवर Her King आणि तिच्या अंगठीवर His Queen असं लिहिलेल्या अंगठ्या सध्या ट्रेण्डी आहेत.
तुमची नावं टाकून अशा कस्टमाईज अंगठ्याही तुम्ही बनवून घेऊ शकता.
त्याच्या अंगठीवर बदामाचा आकार आणि तिच्या अंगठीवर खराखुरा बदाम अशा अंगठ्याही हल्ली खूप जण घेतात.
वरील अंगठीमध्येच असा प्लॅटिनम आणि हिरा किंवा स्टोनचा वापर केलेली अशी डिझाईनही पाहायला मिळते.
अशा अंगठीचाही सध्या जबरदस्त ट्रेण्ड आहे.
त्याची अंगठी प्लेन आणि तिच्या अंगठीवर क्राऊन अशा पद्धतीचं डिझाईनही तुम्हाला आवडू शकतं.
तुम्ही आणि तुमच्या घरचे थोडे मुक्त विचारांचे असाल तर अशा पद्धतीची थोडी बोल्ड कपल रिंगही तुम्हाला आवडू शकते. इतरांपेक्षा काही वेगळं हवं असेल तर हे नक्की ट्राय करा.