उर्मिला कोठारेचे खास ब्लाऊज डिजाईन्स; १० नवीन पॅटर्न्स, साडीत खुलून येईल लूक
Updated:December 30, 2024 13:41 IST2024-12-30T13:10:15+5:302024-12-30T13:41:29+5:30
Urmila Kothare's Special Blouse Designs : उर्मिला कोठारेने ट्राय केलेले साडी आणि ब्लाऊजचे लूक्स तुम्हीही लग्न समारंभात, पार्टी किंवा रोजच्या वापरासाठी ट्राय करू शकता.

अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) आपल्या स्टायलिंगमुळे बरीच प्रसिद्ध असते. उर्मिलाचे वेगवेगळे साडी आणि ब्लाऊज लूक्स आकर्षक आणि ट्रेंडी असतात.
उर्मिला कोठारेने ट्राय केलेले साडी आणि ब्लाऊजचे लूक्स तुम्हीही लग्न समारंभात, पार्टी किंवा रोजच्या वापरासाठी ट्राय करू शकता.
तिच्या प्रत्येक लूक्समध्ये पारंपारीक तितकाच मॉर्डन टच असतो.त्याचप्रमाणे ती हेअर स्टाईल करते.
मागचा गळा पाठभर शिवून तुम्ही या पद्धतीनं त्यावर पक्षी, नथ, अशा डिजाईन्स बनवून घेऊ शकता.
सणवाराला नेसण्यासाठी हे पॅटर्न उत्तम आहे. तर तुमच्या साडीचं ब्लाऊज प्लेन असेल तर तुम्ही हे नक्षी असलेले ब्लाऊज वेगळे विकत घेऊ शकता.
ब्लॅक स्लिव्हजलेस ब्लाऊज तुम्हाला कोणत्याही साडीवर वापरता येईल.
गोल्डन स्लिव्हजलेस ब्लाऊज तुम्हाला कोणत्याही काठापदराच्या साडीवर घालता येईल. फक्त या साडीला गोल्डन बॉर्डर असेल असं पाहा.
ब्लाऊजचा मागचा गळा मोठा शिवून पान गळा, मटका गळा असं पॅटर्न निवडू शकता. ब्लाऊजला मागच्या बाजूने हुक्स लावू शकता.
ब्लाऊजच्या स्लिव्हना तुम्हाला नेट लावून घेऊ शकता.
उर्मिला कोठारेचे हे ब्लाऊज पॅटर्न्स तुम्ही ओरगेंजा, काठपदर, शिफॉन साडीसाठी निवडू शकता.