Join us

उर्मिला कोठारेचे खास ब्लाऊज डिजाईन्स; १० नवीन पॅटर्न्स, साडीत खुलून येईल लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 13:41 IST

1 / 10
अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) आपल्या स्टायलिंगमुळे बरीच प्रसिद्ध असते. उर्मिलाचे वेगवेगळे साडी आणि ब्लाऊज लूक्स आकर्षक आणि ट्रेंडी असतात.
2 / 10
उर्मिला कोठारेने ट्राय केलेले साडी आणि ब्लाऊजचे लूक्स तुम्हीही लग्न समारंभात, पार्टी किंवा रोजच्या वापरासाठी ट्राय करू शकता.
3 / 10
तिच्या प्रत्येक लूक्समध्ये पारंपारीक तितकाच मॉर्डन टच असतो.त्याचप्रमाणे ती हेअर स्टाईल करते.
4 / 10
मागचा गळा पाठभर शिवून तुम्ही या पद्धतीनं त्यावर पक्षी, नथ, अशा डिजाईन्स बनवून घेऊ शकता.
5 / 10
सणवाराला नेसण्यासाठी हे पॅटर्न उत्तम आहे. तर तुमच्या साडीचं ब्लाऊज प्लेन असेल तर तुम्ही हे नक्षी असलेले ब्लाऊज वेगळे विकत घेऊ शकता.
6 / 10
ब्लॅक स्लिव्हजलेस ब्लाऊज तुम्हाला कोणत्याही साडीवर वापरता येईल.
7 / 10
गोल्डन स्लिव्हजलेस ब्लाऊज तुम्हाला कोणत्याही काठापदराच्या साडीवर घालता येईल. फक्त या साडीला गोल्डन बॉर्डर असेल असं पाहा.
8 / 10
ब्लाऊजचा मागचा गळा मोठा शिवून पान गळा, मटका गळा असं पॅटर्न निवडू शकता. ब्लाऊजला मागच्या बाजूने हुक्स लावू शकता.
9 / 10
ब्लाऊजच्या स्लिव्हना तुम्हाला नेट लावून घेऊ शकता.
10 / 10
उर्मिला कोठारेचे हे ब्लाऊज पॅटर्न्स तुम्ही ओरगेंजा, काठपदर, शिफॉन साडीसाठी निवडू शकता.
टॅग्स : खरेदीफॅशन