World Sari Day 2021: कतरिनापासून आलियापर्यंत बॉलिवूड स्टार्सनी नेसलेल्या 'या' स्टायलिश साड्या; पाहा एकापेक्षा एक वॉव लूक Published:December 21, 2021 12:04 PM 2021-12-21T12:04:36+5:30 2021-12-21T12:56:38+5:30
World Sari Day 2021: साडीसोबत रोज वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. तुम्हालाही वेगळ्या पद्धतीने साडी नेसायची असेल, तर तुम्ही या बॉलिवूड अभिनेत्रींकडून टिप्स घेऊ शकता. भारतीय महिलांसाठी साडी खूप खास आहे. प्रत्येकाच्याच कपाटात तुम्हाला साडी सापडल्याशिवाय राहणार नाही. इतकंच नाहीतर परदेशी महिलाही साडीकडे आकर्षित होत आहेत. काळाच्या ओघात साड्या खूप स्टायलिश झाल्या आहेत. साड्या परिधान करण्याच्या अनेक पद्धती आहेत. साडीसोबत रोज वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. तुम्हालाही वेगळ्या पद्धतीने साडी नेसायची असेल, तर तुम्ही या बॉलिवूड अभिनेत्रींकडून टिप्स घेऊ शकता. (World sari day 2021)
सोडीसोबत कोल्ड शोल्डर ब्लाऊज
तुम्ही आतापर्यंत खूपदा कोल्ड शोल्डर टॉप आणि कपडे घातले असतील, पण सोनमप्रमाणे तुम्हीही तुमच्या साध्या साडीला वेगळा लुक देण्यासाठी कोल्ड शोल्डर ब्लाउज वापरून पाहू शकता.
पॅण्ट स्टाईल साडी
साडीला वेस्टर्न आणि बोल्ड लूक देण्यासाठी सोनाक्षी सिन्हाच्या या ग्रे पँट स्टाइलच्या साडीवरून तुम्ही काही कल्पना घेऊ शकता. या लूकमध्ये तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे दिसाल. सोनाक्षीची ही साडी फॅशन डिझायनर अनामिका खन्नानं यांनी डिझाइन केली आहे. पुढच्या वेळी पारंपारिक पद्धतीने साडी नेसण्याऐवजी, सोनाक्षीसारख्या सिगारेट पॅंटसोबत एकत्र या.
फ्यूजन साडी
शिल्पा शेट्टी साड्यांवर सर्वाधिक प्रयोग करताना दिसते. काही काळापूर्वी शिल्पाने तिच्या घरी दिवाळी पार्टी दिली होती. यादरम्यान तिने पांढर्या रंगाची पारदर्शक साडी घातली होती, जी फॅशन डिझाईन अमित अग्रवालने डिझाइन केली होती.
. शिल्पाची ही साडी लोकांना खूप आवडली. या लूकसाठी, शिल्पाने व्हाइट आणि सिल्व्हर कलरमध्ये हॉल्टर नेक ब्लाउजसह मिनी स्कर्ट घातला होता आणि फ्रिल डिझाईनमध्ये पांढर्या रंगाची नेट असलेली पारदर्शक साडी घातली होती.
डीपनेक, सिंगल स्ट्रिप ब्लाऊज
साडीवर हॉट, क्लासी लूक मिळवण्यासाठी तुम्ही साडी आणि ब्लाऊज दोन्ही मॅचिंग करून अशा प्रकारचं ब्लाऊज शिवू शकता.
साडीवर बेल्ट कॅरी करा
एखाद्या स्टायलिश साडीवर तुम्ही बेल्ट कॅरी केला तर रिच लूक दिसून येतो. फोटोत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पदराची स्टाईल करू शकता.
ट्रांसपरंट सारी
फूल स्लिव्हज ब्लाऊजसोबत तुम्ही ट्रांसपरंट निवडू शकता. कतरीना तिच्या लग्नासाठी केलेला नेटच्या साडीच्या लूकवरून तुम्हाला आयडिया येईल.
पोलका प्रिंट साडी
पोलका प्रिंट साडीवर तुम्ही डिजानर ब्लाऊज किंवा क्रॉप टॉपही कॅरी करू शकता.
ट्रेडीशनल साडीवर मॉडर्न लूक
कांजीवरम किंवा काठा पदराच्या कोणत्याही साडीवर तुम्ही आलियानं कॅरी केलेल्या स्टाईलचं ब्लाऊज शिवू शकता. अशा लूकवर तुम्हाला कानात लांब झुमके शोभून दिसतील.