फक्त एका मिनिटांत डास होतील गायब, करा ‘हा’ सोपा उपाय-घरही होईल सुगंध
Updated:December 18, 2024 16:25 IST2024-12-17T12:31:12+5:302024-12-18T16:25:10+5:30

सध्या घरोघरी डासांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळेच तर चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया असे डासांमुळे होणारे आजारही वाढले आहेत.
डासांना पळवून लावणारे वेगवेगळे केमिकल्स असणारे मशिन बाजारात मिळतात. पण त्याचा अनेकांना त्रास होतो. श्वास घ्यायला त्रास होतो तर काहींना सर्दी- खोकला होतो.
म्हणूनच डासांना पळवून लावण्यासाठी आता हा एक घरगुल उपाय करा. हा उपाय alshihacks या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हा उपाय करण्यासाठी कडुलिंबाची ८ ते १० वाळलेली पाने घ्या.
त्यासोबतच ४ ते ५ तेजपत्ता घ्या.
कडुलिंबाची पाने आणि तेजपत्ता धूपदानीमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये टाका आणि त्यात थोडा कापूर टाका.
यानंतर कापूर पेटवून तिन्ही पदार्थ जाळा आणि त्याचा धूर घरभर पसरवा.. यामुळे डास लगेच पळून जातील.